शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत अनसिंगचा अभिषेक राऊत तिसरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 15:57 IST

अनसिंग (वाशिम): येथील जिजामाता विद्यामंदीर शाळेचा विद्यार्थी अभिषेक लक्ष्मण राऊत याने राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत १७ वर्षांखालील ८० ते ८५ किलो वजन गटात तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले.

लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग (वाशिम): येथील जिजामाता विद्यामंदीर शाळेचा विद्यार्थी अभिषेक लक्ष्मण राऊत याने राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत १७ वर्षांखालील ८० ते ८५ किलो वजन गटात तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले. याबद्दल शाळेच्यावतीने त्याचा शनिवारी सत्कार करण्यात आला.अभिषेक राऊतने प्रशिक्षक सेन्साई बालकिसन नवगनकर (राष्ट्रीय पंच तथा ब्लॅक बेल्ट ४ डॅन, मुख्य प्रशिक्षक महाराष्ट्र) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत सहभाग नोंदवून कांस्यपदकावर नाव कोरले. अभिषेकच्या या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला, असे मत खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये, संजय पांडे, जिजामाता विद्यामंदीरच्या प्राचार्या पाटील, सरपंच सिंधू सातव, पांडुरंग ठाकरे, विठ्ठल सातव, रामराव घोलप, बंडून कदम, इम्रान कुरेशी, राम अंकूशकर आदिंनी व्यक्त केले. अभिषेकने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल व प्रशिक्षक नवगनकर यांना दिले. दरम्यान, अभिषेकला पुढच्या वाटचालीसाठी पूर्णपणे सहकार्य करू, असे आश्वासन जिजामाता विद्यामंदीरचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी दिले.-

टॅग्स :washimवाशिम