शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कर्मचार्‍यांच्या मदतीला ‘अभिनव संकलन अँप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:08 IST

वाशिम : स्थानिक पातळीवर कृषीविषयक योजनांची कामे  सुसह्य व्हावी, शेतकर्‍यांची माहिती एकत्रित करणे सोपे  व्हावे आणि कृषी सहायकांवरील कामाचा अतिरिक्त ताण  कमी व्हावा, या उद्देशाने वाशिमचे तालुका कृषी अधिकारी  अभिजित देवगिरीकर यांनी ‘अभिनव संकलन’ या नावाचे  ‘मोबाइल अँप’ तयार केले असून, त्याचा प्रभावीरीत्या वा परही केला जात आहे. 

ठळक मुद्देतालुका कृषी अधिकार्‍यांनी तयार केले अँप कामाचा ताण  निवळला

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक पातळीवर कृषीविषयक योजनांची कामे  सुसह्य व्हावी, शेतकर्‍यांची माहिती एकत्रित करणे सोपे  व्हावे आणि कृषी सहायकांवरील कामाचा अतिरिक्त ताण  कमी व्हावा, या उद्देशाने वाशिमचे तालुका कृषी अधिकारी  अभिजित देवगिरीकर यांनी ‘अभिनव संकलन’ या नावाचे  ‘मोबाइल अँप’ तयार केले असून, त्याचा प्रभावीरीत्या वा परही केला जात आहे. देवगिरीकर यांनी ‘अभिनव संकलन’ या ‘अँप’बाबत  अधिक माहिती देताना सांगितले, की शासन स्तरावरून  जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आणि पीक कापणी  प्रयोग असे तीन प्रकारचे मोबाइल अँप वापरले जातात. त्याचा अपेक्षित फायदादेखील होत आहे. मात्र, योजनांतर्गत  लाभार्थींच्या अर्जांची माहिती गोळा करण्याबाबत अशी  कुठलीच सोय नव्हती. त्यामुळे सर्वार्थाने कठीण असलेले हे  काम करीत असताना कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी,  कृषी पर्यवेक्षकांसोबतच तालुका कृषी अधिकार्‍यांनाही अ तोनात त्रास होत असे, ही बाब लक्षात घेऊन सखोल  अभ्यासांती ‘गुगल’वरील ‘अँप शीट’च्या माध्यमातून आपण  ‘अभिनव संकलन अँप’ची निर्मिती केली. वाशिम तालुक्या तील सर्व कृषी सहायकांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन ‘अँ प’च्या वापरासाठी प्रोत्साहित करण्यात आल्याचे देवगिरीकर  यांनी सांगितले.

असे उपयोगात येते ‘अँप’या अँपमध्ये लाभार्थीचे नाव, गाव, मोबाइल नंबर, प्रवर्ग, क्षेत्र  वर्गीकरण आदी माहितीसोबतच संबंधित शेतकर्‍याला कॉल  करणे, एसएमएस करणे आदी सुविधा पुरविण्यात आल्या  आहेत. विशेष म्हणजे ‘एक्सेल शीट’मधून हा ‘अँप’ कार्य  करीत असल्याने केवळ लाभार्थीचे नाव भरल्यास इतर माहि ती पर्यायांच्या माध्यमातून भरणे सोपे असल्याने सर्व कृषी  सहायकांनी ते विनाविलंब आत्मसातदेखील केले. ‘अभिनव संकलन’च्या माध्यमातून २८ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर  २0१७ या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर सिंचन साधने या  बाबीखाली अर्ज भरून घेण्यात आले असून, त्यास अप्रतिम  प्रतिसाद लाभत तब्बल ४0४९ अर्ज तालुका कृषी अधिकारी  कार्यालयास प्राप्त झाल्याची माहिती देवगिरीकर यांनी दिली. 

कृषी सहायकही झाले ‘हायटेक’!सदोदित शेतकर्‍यांच्या अवतीभोवती आणि विशेषत: ग्रामीण  भागात वावरणार्‍या बहुतांश कृषी सहायकांजवळ अँन्ड्रॉइड  मोबाइल आहेत; पण त्याची उपयुक्तता केवळ फोन लावणे  आणि आलेला फोन उचलणे एवढीच होती. ‘अभिनव  संकलन’ या अँपमुळे मात्र वाशिम तालुक्यातील सर्वच कृषी  सहायक ‘हायटेक’ झाले असून, ‘ऑनलाइन’ प्रक्रियेच्या  मुख्य प्रवाहात सामील होऊ पाहत असल्याचे तालुका कृषी  अधिकारी देवगिरीकर यांनी सांगितले.