शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे दुसरे जिल्हा मराठी संमेलन रविवारी वाशिममध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 15:44 IST

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय आणि विदर्भ साहित्य संघ शाखा, वाशिम यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे दुसरे जिल्हा मराठी संमेलन येत्या १७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देफुले महाविद्यालय, वि.सा.संघाचा पुढाकार: विविध उपक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय आणि विदर्भ साहित्य संघ शाखा, वाशिम यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे दुसरे जिल्हा मराठी संमेलन येत्या १७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता प्रा. डॉ. अनिल सोनुने, प्रा. सुरेंद्र वानखेडे आणि सहकारी स्वराभिवादन हा कार्यक्रम सादर करतील. यावेळी डॉ. सरोज बाहेती यांच्याहस्ते ग्रामीण वस्तू प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. काव्याग्रहाचे व्यवस्थापकीय संपादक तथा समर्थ अकादमीचे संचालक विठ्ठल जोशी यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा. डॉ. सुनील अभिमान अवचार हे संमेलनाध्यक्ष, तर प्रा. हरिभाऊ क्षीरसागर हे स्वागताध्यक्ष आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी मुख्य अतिथी आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, नामदेव कांबळे, बाबाराव मुसळे, नरेंद्र लांजेवार, हर्षवर्धन पवार, प्र. म. राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. महामंडळाचे कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके हे संमेलनामागील भूमिका मांडतील. त्यानंतर सकाळी साडेअकरा ते एक या वेळेत ‘लोकजीवनाची विविध रूपे’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. यात डॉ. नीलेश हेडा ‘नदीकाठची दुर्लक्षित समाजरूपे’, प्रल्हाद पौळकर ‘आदिवासी आणि लोककला’, मोहन शिरसाट ‘ऐतिहासिक वारसा’, प्रा. अनंत देव ‘सण उत्सव, परंपरा’, सतीश जामोदकर ‘कृषी जीवन’ हे या विषयांसह सहभागी होतील. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान डॉ. श्रीकांत राजे भूषवणार आहेत.याचदिवशी दुपारी दोन ते तीन या वेळेत ‘इरसाल नमुन्यांची गावरान झलक’, हा मिश्कील अनुभव कथांवर आधारित कार्यक्रम होईल. त्याचे अध्यक्षस्थान भारत लादे भूषवणार असून यात राजेश ठवकर, गोपाल खाडे, चाफेश्वर गांगवे, नीलेश सोमाणी, प्रवीण राऊत सहभागी होणार आहेत. त्यानंतर मुलाखतकार डॉ. विजय काळे हे नेत्रदूत चेतन उचितकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत ‘असे बोलते माझे विश्व’, हा महिलांचा टॉक शो होणार आहे. यात डॉ. लता जावळे, प्रा. यास्मिन शेख, डॉ. अर्चना मेहकरकर, सिंधू तुपकर, अ‍ॅड. गीतांजली गवळी, डॉ. प्रियांका विभूते सहभागी होणार आहेत. दुपारी साडेचार ते पाच या वेळेत संमेलनाचा समारोप होईल, असे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिम