शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

९६ अन्न सुरक्षा गटाच्या महिला फुलविणार परसबाग!

By नंदकिशोर नारे | Updated: August 10, 2023 15:23 IST

८ ऑगस्टला वाशिम येथे महिलांना बहुस्तरीय शेती पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

वाशिम : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ९६ अन्न सुरक्षा गटाच्या महिला या बहुस्तरीय शेती पद्धतीचा म्हणजे मल्टी लेयर फार्मिंग करून परसबाग फुलविणार आहेत. त्याअनुषंगाने ८ ऑगस्टला वाशिम येथे महिलांना बहुस्तरीय शेती पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

अध्यक्षस्थानी आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात ९६ महिला अन्नसुरक्षा गटाची स्थापना करण्यात आली. संबंधित शेतकरी गटातील प्रतिनिधी महिला या प्रशिक्षणास उपस्थित होत्या.

डॉ. प्रशांत घावडे यांनी आत्माअंतर्गत अन्नसुरक्षा गटास विविध भाजीपाला व फळझाडे यांच्या लागवड पद्धती व वाणांचे गुणवैशिष्ट्ये बाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी अनिसा महाबळे , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील अन्नसुरक्षा गटाच्या महिला प्रतिनिधी प्रशिक्षणाला बहुसंख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन इंगोले, विजय दुधे, रामेश्वर पाटील, संजय राऊत, आत्मा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.महिलांवर विशेष जबाबदारी!

परिवाराच्या पोषणाची जबाबदारी महिलांवर असते. परिवारातील सदस्यांना सकस अन्न कसे मिळेल याकडे महिला सातत्याने लक्ष देतात. त्यामुळे विशेषतः महिलांनी अन्न सुरक्षा गटांमार्फत बहुस्तरीय शेती पद्धतीचा अवलंब करून परसबाग तयार करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला. बहुस्तरीय शेती पद्धतीचा म्हणजे मल्टी लेयर फार्मिंग करून परसबाग निर्मितीद्वारे ९६ अन्नसुरक्षा गटातील जवळपास ९६० ते १००० महिलांना याचा लाभ मिळणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात परसबाग बियाणे व फळझाडे रोपे किटचे वाटपसुद्धा करण्यात आले.