शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

वाशिम जिल्ह्यात १,००० मुलांमागे ९२० मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 12:32 IST

Washim News सन २०१५-१६ दर हजार मुलांमागे असलेल्या ९०३ मुलींची संख्या सन २०१९-२० वर्षात ९२० वर गेली आहे. 

ठळक मुद्दे२०११ मध्ये लिंग गुणोत्तराचे प्रमाण दर हजार मुलांमागे ८९० असे होते. २०१९-२० मध्ये हजार मुलांमागे १७ मुलींची संख्या वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गत काही वर्षात मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे दिसून येते. सन २०१५-१६ दर हजार मुलांमागे असलेल्या ९०३ मुलींची संख्या सन २०१९-२० वर्षात ९२० वर गेली आहे. घराच्या उंबरठ्यापलीकडे विश्व नसलेली बाई आपले घर सावरायला बाहेर पडली, बघता बघता तिने तिथेही प्रगती केली. आजमितीला तर मुलींनी प्रगती केली नाही असे एकही क्षेत्र उरले नाही. पालकांना, कुटुंबीयांना याचा यथोचित अभिमानही असतो. तरीही आईच्या पोटातला गर्भ मुलीचा आहे हे कळल्यावर तो नष्ट करण्यासाठी राज्यात सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात प्रयत्न होतात. यावर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर कायदे अमलात आणत विविध उपक्रम हाती घेतले. स्त्री भ्रूणहत्या टाळा, मुलीचा जन्मदर वाढविण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. बेटी बचाओ-बेटी पढाओ या अभियानात जिल्ह्याचा समावेश आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणे सुरू आहे. याबरोबरच आरोग्य व जिल्हा प्रशासनातर्फेदेखील जनजागृती करण्यात आले आहे. याचे चांगले परिणाम दिसून येत असून, २०१५-१६ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये हजार मुलांमागे १७ मुलींची संख्या वाढली आहे.एकीकडे महिलांवरील अन्याय वाढत आहेत तर दुसरीकडे कन्या जन्मांची संख्याही वाढत असल्याचे जिल्ह्यात समाधानकारक चित्र आहे. २०११ पर्यंतचे लिंगगुणोत्तराचे आकडे पाहिले तर जिल्हा डेंजर झोनमध्ये होता, हे प्रकर्षाने जाणवते. २०११ मध्ये लिंग गुणोत्तराचे प्रमाण दर हजार मुलांमागे ८९० असे होते. २०११ नंतर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जनजागृतीमुळे स्त्री-पुरुषांचे लिंगगुणोत्तर वाढत आहे.  तथापि, अद्यापही लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील तफावत समाधानकारकपणे कमी झाली नाही

सन २०१९-२० मध्ये दर हजार मुलांमागे जिल्ह्यात ९२० मुली आहेत. चालू वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत हेच प्रमाण ९४३ वर पोहोचले आहे. लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील तफावत दूर करून स्त्री जन्मदर वाढविण्यासंदर्भात जिल्ह्यात जनजागृती करण्यात येते.- डाॅ. मधुकर राठोड जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिम