शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींचा कारभार भाड्याच्या इमारतीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:34 IST

वाशिम : गावपातळीवरील विकासकामांचे ज्याठिकाणी नियोजन केले जाते, त्या जिल्ह्यातील ४९३ पैकी तब्बल ९७ ग्रामपंचायत कार्यालयांचा कारभार भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहे. गं

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गावपातळीवरील विकासकामांचे ज्याठिकाणी नियोजन केले जाते, त्या जिल्ह्यातील ४९३ पैकी तब्बल ९७ ग्रामपंचायत कार्यालयांचा कारभार भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहे. गंभीर बाब म्हणजे या इमारतींमध्ये कुठल्याही स्वरूपातील सुविधा नसल्याने कामकाज वारंवार प्रभावित होत असून कर्मचारी पुरते त्रस्त झाले आहेत.जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची कार्यालयांची स्थिती अत्यंत चिंताजनक असून एकाच ग्रामसेवकाकडे अनेक ग्रामपंचायतींचा कारभार असणे, सरपंच-उपसरपंचांसह सदस्य कार्यालयात नियमित न येणे, अन्य कर्मचारीही गैरहजर असणे आदी कारणांमुळे गावपातळीवरील विकासकामांना खीळ बसत आहे. त्यातच ९७ ग्रामपंचायतींना स्वत:च्या हक्काची इमारतच नसून भाड्याच्या इमारतीत अथवा गावात कुठेतरी पर्यायी व्यवस्था करून थातूरमातूर स्वरूपात कार्यालये चालविली जात आहेत. त्यात प्रामुख्याने विजेची पुरेशी सुविधा नसणे, पिण्याच्या पाण्याचा अभाव, संगणकांना पुरेशा ताकदीने इंटरनेट स्पीड नसणे, आदी कारणांमुळे ही कार्यालये नसल्यातच जमा आहेत. परिणामी, जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमध्ये वास्तव्यास असलेल्या लोकांचे अनेक मुलभूत प्रश्न निकाली निघणे अवघड झाले आहे. अनेकांना तर आपल्या समस्या ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये नेमक्या कुणाकडे मांडायच्या, याचाही पत्ता अद्यापपर्यंत लागलेला नाही. एकूणच उद्भवलेल्या या सर्व गंभीर स्थितीमुळे विकासकामांचा पुरता बट्याबोळ झाला आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष पुरवून ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयासाठी इमारती उपलब्ध करून देण्यासह ग्रामपंचायतींच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत