शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार सेवा केंद्रांना ७७८ बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 15:32 IST

प्रशासनाने आपले सरकार सेवा केंद्रांना ७७८ बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँकांमधील कर्ज खात्याची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही सद्या अंतीम टप्प्यात आहे. त्यानंतर विविध बँका आणि आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये बायोमेट्रीक पद्धतीने शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकांची पडताळणी होणार असून त्यासाठी प्रशासनाने आपले सरकार सेवा केंद्रांना ७७८ बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी गुरूवारी दिली.सहकार विभागाच्या नियंत्रणाखाली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी केली जात असून या योजनेसाठी राष्ट्रीयीकृत,सहकारी आणि खासगी बँका निवडण्यात आल्या आहेत. १ फेब्रूवारी २०२० पासून स्वतंत्र ‘पोर्टल’ कार्यान्वित करून त्याव्दारे संबंधित बँकांना शेतकºयांची माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात ही प्रक्रिया सद्या अंतीम टप्प्यात आहे. दरम्यान, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या याद्या बँकांना आपापल्या शाखा फलकावर आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या दर्शनी भागात लावाव्या लागणार आहेत.यादरम्यान कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या आधार क्रमांकाची बायोमेट्रीक पद्धतीने पडताळणी केली जाणार आहे. ही सुविधा आपले सरकार सेवा केंद्र आणि संबंधित सर्व बँकांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांना ७७८ बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने १५०; तर इतरही बँकांमध्ये ही उपकरणे उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोडक यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम