शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ई-सेवा केंद्रांतील डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ ग्राहय़!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:47 IST

वाशिम तालुक्यात ७/१२ संगणकीकरणाचे काम पूर्ण  झाले आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय, निमशासकीय  कामासाठी महाभूलेख या पोर्टलवरी सातबारा वापरता येणार  नसून, त्याऐवजी महा ई सेवा केंद्रांमधून आपले सरकार या  पोर्टलद्वारे उपलब्ध करण्यात येणारा डिजिटल स्वाक्षरीचा किंवा  बारकोडचा ७/१२ स्विकारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देवाशिम तहसीलदारांचे निर्देशमहाभुलेख पोर्टलवरील ७/१२ रद्दबातल

शिखरचंद बागरेचा । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वाशिम तालुक्यात ७/१२ संगणकीकरणाचे काम पूर्ण  झाले आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय, निमशासकीय  कामासाठी महाभूलेख या पोर्टलवरी सातबारा वापरता येणार  नसून, त्याऐवजी महा ई सेवा केंद्रांमधून आपले सरकार या  पोर्टलद्वारे उपलब्ध करण्यात येणारा डिजिटल स्वाक्षरीचा किंवा  बारकोडचा ७/१२ स्विकारण्यात येणार आहे. वाशिमच्या  तहसीलदारांनी या संदर्भात सर्व तलाठय़ांना निर्देश दिले असून,  महा ई सेवा केंद्रधारकांनाही आपले सरकार पोर्टलवरील ७/१२  निर्गमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.वाशिम तालुक्यात ७/१२ संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले  असून, आता तालुक्यात डिजिटल स्वाक्षरी किंवा बारकोड व  अँप्लिकेशन आयडीसह ७/१२ उपलब्ध होत आहे. त्यामुळे या पुढे तलाठी व महा ई सेवा केंद्रधारकाची डिजिटल ७/१२ वर  स्वाक्षरीची व शिक्क्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कोणत्याही  शासकीय कामासाठी किंवा कायदेशीर बाबीसाठी महाभूलेख या  पोर्टलवरून निघणारा ७/१२ स्विकारला जाणार नाही किंवा वा परता येणार नाही. या संदर्भात वाशिमचे जिल्हाधिकारी, तसेच  जिल्हा समन्वयकांनी वाशिमच्या तहसीलदारांना पत्र पाठवून  केवळ महा ई सेवा केंद्रामधून मिळणारा डिजिटल स्वाक्षरीचा  किंवा बारकोड असलेला ७/१२ स्विकारण्याबाबत सर्व संबंधि तांना सूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची  अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदारांनी संबंधितांना पत्राद्वारे  सुचित केले आहे. यापुढे शेतकर्‍यांना महा ई सेवा केंद्रांमधून मिळणारा डिजिटल  स्वाक्षरीचा किंवा बारकोड असलेला ७/१२ कोणत्याही  शासकीय कामांसाठी वापरावा लागणार असून, या संदर्भात महा  ई सेवा केंद्रांसह तलाठय़ांकडून अधिक मार्गदर्शन करण्यात  येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची गैरसोय टळणार आहे.