शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जिल्ह्यात ६३ टक्के लोकांनी नाही घेतला एकही डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST

वाशिम : जिल्ह्यात १५ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आता सात महिने उलटून गेले तरी जिल्ह्यातील ...

वाशिम : जिल्ह्यात १५ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आता सात महिने उलटून गेले तरी जिल्ह्यातील ६३. २७ टक्के लाेकांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही, तर दोन डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही केवळ १३ टक्के आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर नागरिक कोरोना लसीकरणाबाबत गंभीर राहिले नसून, आता लसीकरण केंद्र ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील १३ लाख ७४ हजार ७३५ लोकसंख्येपैकी १० लाख १३ हजार १८० नागरिकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात १५ जानेवारीपासून या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आरोग्य, महसूल, पंचायत, पोलीस विभागासह विविध प्रशासकीय विभागातील कोरोनायोद्ध्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर ६० वर्षे व त्यावरील वयाचे ज्येष्ठ नागरिक, तसेच ४५ ते ५९ वर्ष वयाेगटातील दुर्धर आजारग्रस्त नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले, तर आता १८ वर्षे व त्यावरील सर्वच वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. मे महिन्याच्या मध्यंतरापर्यंत या लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळत होता, परंतु त्यानंतर कोरोना संसर्ग नियंत्रित होऊ लागल्याने लसीकरणाबाबत नागरिक गंभीर राहिले नसून, लसीकरण केंद्र ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

----आवश्यक प्रमाणात लाभार्थींसाठी प्रतीक्षेची वेळ

कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ केली आहे. त्यामुळे लसींच्या वेस्टेज मायनसचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लसीच्या एका व्हायलमधून १० ते १२ लोकांना लस देणे अपेक्षित असते. त्यामुळे व्हायल वापरात घेण्यापूर्वी आवश्यक प्रमाणात लाभार्थींची संख्याही पडताळण्याची वेळ लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांवर आली आहे.

----------------

तिसऱ्या लाटेच्या धोक्याकडे दुर्लक्ष

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका वाढू लागला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आता कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे; परंतु जिल्ह्यातील नागरिक कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेबाबत फारसे गंभीर नसून, याचा मोठा विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

-------------------

-कोट : जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध असून, नागरिकांचे लसीकरण तातडीने पूर्ण करण्याची धडपड सुरू आहे. तथापि, कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याचे दिसत असल्याने नागरिक लसीकरणाबाबत उदासीन झाल्याचे वाटू लागले आहे. त्यामुळे लसीकरणाचा अपेक्षित प्रमाणात वाढत नाही.

- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

---------------------------

जिल्ह्याची लोकसंख्या - १३, ७४,७३५-

लसीकरणाचे उद्दिष्ट - १०,१३,१८०-

पहिला डोस घेणारे - ३,६७,०८७-

दुसरा डोस घेणारे - १,३१,७४६

--------------------------

लसीकरणाची तालुकानिहाय स्थिती

तालुका - उद्दिष्ट - पहिला डोस - दुसरा डोस

वाशिम - २,११,१०३ - ७७,५२४ - ३५,९४४

कारंजा - १,७६,८७३ - ७१,९४४ - २८,९४५

मंगरुळपीर - १,४४,९४० - ५५,५३२ - २१३८

६रिसोड - १,७१,६९१ - ३५,८२१ - १०,८०५

मालेगाव - १,७२,६०५ - ४३,७५४ - १४,२८०

मालेगाव - १,३५,९६८ - ४३,७५४ - १४,२८०