शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्याबाई होळकर सभागृहासाठी ६२.५३ लाखाचा निधी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 14:49 IST

शेलुबाजार (वाशिम) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरावर सांस्कृतिक सभागृह निर्माण करण्यासाठी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या माध्यमातून शेलूबाजार येथे ६२ लाख ५३ हजार रुपये खर्चाच्या सांस्कृतिक सभागृह कामाला मंजुरात मिळाल्याची माहीती पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे यांनी दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्क शेलुबाजार (वाशिम) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरावर सांस्कृतिक सभागृह निर्माण करण्यासाठी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या माध्यमातून शेलूबाजार येथे ६२ लाख ५३ हजार रुपये खर्चाच्या सांस्कृतिक सभागृह कामाला मंजुरात मिळाल्याची माहीती पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे यांनी दिले. राज्य शासनाकडे चालू आर्थिक वर्षांत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या गावांतर्गत मूलभूत सुविधा योजनेंतर्गत जुलै २०१८ च्या पावसाळी अधिवेशनात १०० कोटी इतकी पूरक मागणी मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ४० कोटी इतका निधी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सभागृह बांधकामासाठी राखून ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच योजने अंतर्गत शेलूबाजार येथे सभागृहाच्या बांधकामासाठी शासनाच्या निकषाप्रमाणे जागा उपलब्ध असल्याने ६२ लाख ५३ हजार रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. सभागृहाचे क्षेत्रफळ १२५ चौरस मिटर इतके असून यामध्ये विद्युतीकरण, वॉटर हार्वेस्टिंग, पाणीपुरवठा, आकस्मिक निधी, संरक्षक भिंत, प्रवेशव्दार, अंतर्गत रस्ते, सौर पथदिवे, व पाण्याचे पंप आदी बाबीचा सदर अंदाजपत्रकात समावेश केला आहे. येथील धनगर समाजासाठी आजपर्यंत सामाजिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोणत्याच प्रकारची व्यवस्था नव्हती. त्यामुळे धनगर समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत होता, मात्र खासदार डॉ विकास महात्मे यांच्या माध्यमातून प्रथमच येवढ्या मोठ्या प्रमाणात समाज बांधवासाठी निधी मंजूर करण्यात आल्याने धनगर समाज बांधवात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशी माहीती पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम