शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेची ६२ कामे मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:42 IST

शासनाने तांडा वस्ती सुधार योजना  कार्यान्वित केली.  वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजूर करण्यात आली  असून, त्यासाठी ३ कोटी १५ लाख रु पयांच्या  निधीची  तरतूद करण्यात आली, अशी  माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनल महाराज राठोड यांनी रविवारी १९ रोजी पत्रकार  परिषदेत दिली.

ठळक मुद्दे३ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : मागासलेल्या व अविकसित तांड्यावस्तीचा विकास व्हावा, तेथे मूलभूत सुविधा  प्राप्त होऊन नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने शासनाने तांडा वस्ती सुधार योजना  कार्यान्वित केली.  वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजूर करण्यात आली  असून, त्यासाठी ३ कोटी १५ लाख रु पयांच्या  निधीची  तरतूद करण्यात आली, अशी  माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनल महाराज राठोड यांनी रविवारी १९ रोजी पत्रकार  परिषदेत दिली.स्थानिक विश्राम भवनावर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ते म्हणाले,  की भाजपाचे  जिल्हाध्यक्ष तथा कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या  प्रयत्नामुळे व शासन दरबारी  सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे  वाशिम जिल्ह्यात ३१ तांडा  व ३१ वस्ती असे मिळून ६२ कामे मंजूर झाली. त्यासाठी समाजकल्याण विभागाकडून ३  कोटी १५ लाख रुपये निधीची  तरतूद झाली. डी.पी.डी.सी.मार्फत अडीच कोटी रुपये  मंजूर झाली, तसेच शासनातर्फेसुद्धा ३0 टक्के कपात झाली. शासनातर्फेसुद्धा अडीच  कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यातील ३0 टक्के  कर्जमाफीसाठी कपात करण्यात आले.  पाच कोटी रुपायांतील ६0 टक्के रक्कम कपात झाली. उर्वरित ३ कोटी १५ लाखांचा  निधी या कामासाठी मंजूर आहे. सदर कामाचे  इस्टिमेट तयार करून संबंधित  गावाच्या  ग्रामपंचायतीने कामे त्वरित सुरू करावी, असेही ते म्हणाले. ही कामे ज्या तांड्यात, वस्तीत  करावयाची आहे, तेथे नामफलक लावावा, जेथे नामफलक दिसणार नाही, तेथील अंतिम  देयक मिळणार नाही, अशा सूचना आपण केल्या आहेत. ज्या तांड्यात, वस्तीत गरज  आहे, तेथेच ही कामे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात टाकण्यात आली आहेत.  तांड्या-वस्तीत एखादा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी जागा नसते म्हणून प्राधान्यक्रम हा  सभागृह बांधण्यावर दिला आहे. त्यासाठी गावाच्या ग्रामसेवकांनी तसे प्रस्ताव सादर केले  पाहिजे. सदरहू कामे दज्रेदार व्हावीत, असा आग्रह आमचा आहे, असेही सुनील महाराज  यांनी सांगितले. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्ह्यात एवढय़ा मोठय़ा  प्रमाणात विकास कामे झाल्यानंतर  तांड्याचा,  वसतीचा चेहरामोहरा बदलणार आहे. पत्रकार परिषदेला भाजपाचे तालुका अध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, संगायोचे  अध्यक्ष  नीळकंठ पाटील, डॉ.अविनाश  लोथे, वाईगौळचे उपसरपंच जयसिंग राठोड, शेखर  जाधव आदी उपस्थित होते.