शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायतींचा ५६ टक्के निधी अखर्चित !

By admin | Updated: March 23, 2017 02:24 IST

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; ४४ कोटींचा निधी वितरित, १९.३६ कोटींचा खर्च.

संतोष वानखडे वाशिम, दि. २२- जिल्हयातील ४९१ ग्राम पंचायतींना २0१५-१६ व २0१६-१७ या कालावधीत १४ व्या वित्त आयोगातून ४४ कोटी रुपयांचा निधी मिळालेला असतानाही, जानेवारी २0१७ पर्यंंत केवळ १९.३६ कोटींचा खर्च करण्यात आला. २४.६४ कोटी रुपये अखर्चित असून, ही टक्केवारी ५६ च्या घरात जाते. १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी सन २0१५-१६ या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षे ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. जिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींना एकूण ४४ कोटी सात हजार रुपयांचा निधी वितरित केल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने जमा-खर्चाचा आढावा घेतला असता तब्बल २४ कोटी ६४ लाख ३ हजार ३६१ रुपये अखर्चित असल्याचे स्पष्ट झाले.एकिकडे अनेक गावांत मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत तर दुसरीकडे १४ व्या वित्त आयोगांतर्गतचा निधीही त्या-त्या गावात मोठय़ा प्रमाणात अखर्चित राहत असल्याने, ग्रामपंचायतींकडून गावकर्‍यांची दिशाभूल होण्याची भीती वर्तविली जात आहे.स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी दरवर्षाला भरघोष निधी मिळणार असल्याने गावात मुलभूत सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या गावकर्‍यांच्या पदरी यामुळे निराशा पडली आहे. बहुतांश ग्रामपंचायतींचा लाखो रुपयांचा निधी अखर्चित राहत असतानाही, शासनाकडून निधीच मिळत नसल्याचे ह्यरडगाणेह्ण ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी व सचिवांकडून गायिले जाते. पदाधिकारी व ग्रामसचिवांच्या ह्यरडगाण्याह्णचे पितळ अखर्चित निधीच्या आकडेवारीने उघडे पाडले आहे. प्राप्त व अखर्चित निधीचा लेखाजोखा तालुकाप्राप्त निधी(लाख)           अखर्चित निधी (लाख)वाशिम             ८१.३५                      १0.१४मालेगाव           ७७.५७                      ६२.८८रिसोड                ७८.२८                     ५८.४२कारंजा              ६७.५२                      ४१.२८मानोरा              ६७.९५                      ३३.३९मंगरूळपीर        ६७.२९                      ४0.२७