वाशिम : येथील पंचायत समिती परिसरात असलेल्या गटसाधन केंद्रासमोर दुचाकीच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्याने रोख ५५ हजार रुपये लंपास केले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथील बबन ग्यानुजी शेंडगे (५३) हे पंचायत समितीमध्ये काही कामानिमित्त आले होते. यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये रोख ५५ हजार रुपये व इतर महत्त्वाची कागदपत्रे ठेवली होती.
डिक्कीतून ५५ हजार लंपास
By admin | Updated: April 11, 2015 01:45 IST