शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

वाशिम जिल्ह्यातील ५३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 11:20 IST

53 villages in Washim district corona free : जिल्ह्यातीलच ५३ गावांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्गाच्या भीतीने जो-तो घाबरलेल्या अवस`थेत आहे. प्रशासनही संसर्गाच्या संकटापुढे हतबल झाले आहे. असे असताना जिल्ह्यातीलच ५३ गावांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्याची किमया साध्य केली आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे बाधीत पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. तेव्हापासून दिवसागणिक ही संख्या वाढत गेली. सोबतच कोरोनाने मृत्यू होण्याच्या प्रमाणातही गेल्या काही दिवसांत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील ५३ गावांमध्ये अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यात वाशिम तालुक्यातील कुंभारखेडा, मालेगाव तालुक्यातील कोल्ही, हनवतखेडा, जोगलदरी, वाकापूर, गांगलवाडी, भामटवाडी, पिंपळवाडी, सोनखास, साखरापूर, रिसोड तालुक्यातील मुंगसाजी नगर, जायखेडा, तपोवन, मंगरूळपीर तालुक्यातील रुई, एकांबा, मानोरा तालुक्यातील वडगाव, बळीराम नगर, उंबर्डा, जामदरा, जवळा, देवठाणा, एकलारा, इंगलवाडी, मेंदरा, वटफळ, कारंजा तालुक्यातील अलीमर्दापूर, तारखेडा, तांदळी, मुकूटपूर, जयपूर, अजमपूर, गंगापूर, वहीतखेड, पलाना, जानोरा, पानगव्हाण, वाकी, मांडवा, तपोवन, खेडा खु., जामठी, जलालपूर, शहादतपूर, मजलापूर, ढंगारखेडा, डोंगरगाव या गावांचा समावेश आहे.

गावातील लोकांनी बाहेरगावी ये-जा करणे बंद केले. आवश्यकता नसताना बाजारात किंवा गर्दीच्या ठिकाणी कोणी जात नाही. गावातील प्रत्येकजण मास्कचा वापर करतो. स्वत:च्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतो. त्यामुळेच गावात आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ही आमच्यासाठी भूषणावह बाब आहे.- संजय राठोड, सरपंच, ग्रा.पं. देवठाणा

गावकऱ्यांनी सुरूवातीपासूनच कोरोनाची मनात भीती बाळगली नाही; मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी तंतोतंत पालन केले. पाैष्टीक आहार घेणे, बाहेरगावी प्रवास करायचा झाल्यास तोंडाला मास्क लावणे, फिजीकल डिस्टन्सिंग ठेवण्याचा नियम पाळला जातो. त्यामुळेच कोरोनाला रोखणे शक्य झाले आहे.- उत्तम अंबोरेसरपंच, कोलार, ता. मानोरा

गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी वेळोवेळी ध्वनिक्षेपकाव्दारे जनजागृती केली. गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क लावणे आदी नियमांचे काटेकोर पालन करण्यास गावकऱ्यांना प्रोत्साहित केले. गावातील महिलांनाही कोरोना चाचणी बंधनकारक केली. त्यामुळेच अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण गावात आढळला नाही.- सुनील राऊतसरपंच, हनवतखेडा (ता.मालेगाव) 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या