शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

५२ ‘लोटा’बहाद्दरांकडून ६२ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:16 IST

शिरपूर जैन : जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने शिरपूर परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजतापासून राबविलेल्या धडक मोहिमेत ७५ ‘लोटा’बहाद्दरांना पकडले. यापैकी ५२ जणांकडून प्रत्येकी १२00 रुपयांप्रमाणे एकूण ६२ हजार ४00 रुपयांचा दंड ऑन दी स्पॉट वसूल केला, तर उर्वरित २३ जणांना तातडीने दंड जमा करण्याची सक्त ताकीद दिली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने राबविली मोहीम ५२ जणांकडून वसूल केला ६२ हजार ४00 रुपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने शिरपूर परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजतापासून राबविलेल्या धडक मोहिमेत ७५ ‘लोटा’बहाद्दरांना पकडले. यापैकी ५२ जणांकडून प्रत्येकी १२00 रुपयांप्रमाणे एकूण ६२ हजार ४00 रुपयांचा दंड ऑन दी स्पॉट वसूल केला, तर उर्वरित २३ जणांना तातडीने दंड जमा करण्याची सक्त ताकीद दिली.गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी गुड मॉर्निंंग पथकाने पोलीस, होमगार्डच्या सहकार्याने सहा वाहनांचा ताफा घेऊन शिरपूर येथे बुधवारी पहाटेच्या दरम्यान विशेष मोहीम राबविली. यावेळी उघड्यावर शौचास जाणार्‍या ७५ लोकांना पकडले. त्यांना शिरपूर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. यावेळी ५२ व्यक्तींकडून प्रत्येकी १२00 रुपयांप्रमाणे एकूण ६२,४00 रुपये रोख स्वरूपात दंड वसूल केला. ज्यांच्याकडे पैसे उपलब्ध नव्हते, अशा उर्वरित २३ लोकांना लवकरात लवकर दंड भरण्याचे निर्देश दिले. दंड न भरणार्‍यांवर पोलीस कारवाईचे पोलिसांना लेखी निवेदन देण्यात आले. ही मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या नेतृत्वात जिल्हा स्वच्छता कक्ष व पंचायत समितीच्या पथकाने राबविली. दरम्यान, एका ग्रामपंचायत कर्मचार्‍यालादेखील शौच करताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून १२00 रुपये दंड वसूल करण्यात आला.या पथकामध्ये मग्रारोहयोचे गटविकास अधिकारी संदीप कोटकर, स्वच्छ भारत मिशन कक्षाचे राजू सरतापे, प्रफुल्ल काळे, शंकर आंबेकर, राम शंृगारे, विस्तार अधिकारी सोलव, पुष्पलता अफुणे, अमित घुले, विजय नागे, प्रदीप सावळकर, रविचंद्र पडघान, गटसमन्वयक महादेव भोयर, अभय तायडे, ज्ञानेश्‍वर महल्ले, सदानंद राऊत, सुखदेव पडघान, दत्ता चव्हाण यांच्यासह शिरपूर ग्रा.पं.चे कर्मचारी पिरू रेघीवाले, महावीर बेलोकार, खडसे, संजय देशमुख, राजू भांदुर्गे, राजू जोशी इतर अधिकारी-कर्मचारी यांनी भाग घेतला. दरम्यान, सकाळच्या वेळी अनेक गोरगरीब नागरिकांकडे दंडाची १२00 रुपयांची रक्कम नसल्याने धावपळ उडाली. अनेकांनी या दंडात्मक कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली.