शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल अखेर नुकसानभरपाईसाठी ५.१४ कोटींचा निधी

By दिनेश पठाडे | Updated: June 7, 2023 18:18 IST

...अखेर  नुकसानभरपाईसाठी ५ कोटी १४ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

वाशिम : जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानानंतर वेळो वेळी शासनस्तरावर निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार शासनाकडून निधी मंजूर केला जात आहे. मार्च महिन्यात व  ७ आणि ९ एप्रिल रोजी झालेल्या नुकसानभरपाईचा निधी यापूर्वीच जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता एप्रिल अखेर  नुकसानभरपाईसाठी ५ कोटी १४ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवेळी पावसामुळे पीक नुकसानभरपाईसाठी शासनस्तरावर वेगवेगळ्या टप्प्यात यापूर्वी निधी मंजूर करण्यात आला आहे. १७ ते ३० एप्रिल यादरम्यान झालेल्या नुकसान म्हणून शासनाने निधी मंजूर केला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील अवकाळी, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे २९७३.५९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. ५ हजार २२ शेतकऱ्यांना फटका बसला होता. पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आढळून आले होते. शासन निकषानुसार या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अहवाल पाठविला होता. त्यानुसार निधी मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी लवकरच वर्ग केला जाणार आहे. दरम्यान, त्यानंतर झालेल्या नुकसानभरपाईचा अहवाल शासनस्तरावर पाठविण्यात आला असून  निधी मंजूर होणार असल्याचे सांगण्यात आले.

मदतीचा निधी वळता करु नयेबाधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानप्रमाणात रक्कम जमा केली जाते. काही बँका ही रक्कम कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करण्याची शक्यता असते. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान रक्कम मिळत नाही.  नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खाते व अन्य वसुलीसाठी वळता करु नये, अशा सूचना जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस. यांनी बँकांना दिल्या आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार