वाशिम : महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटना यांच्या मान्यतेने आणि वाशिम जिल्हा हौशी धनुर्विद्या असोसिएशन वाशिम यांच्यावतीने स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर पार पडलेल्या स्पर्धेत एकूण ५0८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत अमरावतीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धेत तीन सुवर्ण, चार रौप्य, तसेच एक कांस्य, अशी आठ पदके पटकावली. राज्यस्तरीय मिनी सबज्युनिअर धनुर्विद्या स्पध्रेत इंडियन, रिकर्व्ह व कम्पाऊंड या तीन प्रकारांचा समावेश होता. मुलींच्या इंडियन राऊंड प्रकारातील वैयक्तिक गटात अमरावतीच्या अश्विनी कोलेने सुवर्ण, अमरावतीच्याच साक्षी तोटेने रौप्य, तर अहमदनगरच्या शुभांगी कावळेने कांस्यपदक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. इंडियन राऊंडमधील मुलींच्या सांघिक गटात अमरावती संघाने सुवर्ण, अहमदनगर संघाने रौप्य, तर पुणे संघाने कांस्यपदक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. मुलांच्या कम्पाऊंड प्रकारातील वैयक्तिक गटात पुण्याच्या मृदुल दत्ताने सुवर्ण, पुण्याच्याच कार्तिक गावंडेने रौप्य, तर पिंपरी चिंचवडच्या किरण गायकवाडने कांस्यपदक पटकावले. मुलांच्या कम्पाऊंड प्रकारातील सांघिक गटात पुणे संघाने सुवर्ण, पिंपरी चिंचवडने रौप्य, तर सातारा संघाने कांस्यपदक पटकावले. मुलींच्या कम्पाऊंड प्रकारातील वैयक्ति क गटात पुण्याच्या दिशा ओस्वालने सुवर्ण, पिंपरी चिंचवडच्या हर्षदा मोहितेने रौप्य, तर सातार्याच्या वैदेही गोसावीने कांस्यपदक पटकावले. रिकर्व्ह प्रकारातील मुलांच्या वैयक्तिक गटात अमरावतीच्या यशोदीप भोगेने सुवर्ण, मुंबईच्या आलोक गुरवने रौप्य, तर अमरावतीच्या वेदांत वानखडेने कांस्यपदक पटकावले. या प्रकारात सांघिक गटात मुंबई शहर संघाने सुवर्ण, अमरावती संघाने रौप्य, तर नांदेड संघाने कांस्यपदक पटकावले. स्पर्धेचे बक्षीस वितरण तहसीलदार आशीष बिजवल, अनिल केंदळे, महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वितेसाठी जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष धनंजय वानखेडे, सचिव अनिल थडकर, अनिल देशमुख, विनोद जवळकर, कलिम बेग मिर्झा, भारत वैद्य व संघटनेच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
सबज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेत ५0८ खेळाडूंचा सहभाग
By admin | Updated: August 26, 2014 22:54 IST