शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

गृह विलगीकरणात ५०० रुग्ण; घरावर झळकतोय  ‘पॉझिटिव्ह’चा फलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:17 IST

CoronaVirus News संबंधित रुग्णाच्या घरावर लहान आकारातील ‘कोविड-१९ पॉझिटिव्ह’ असा फलक (बोर्ड) लावण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना पॉझिटिव्ह; परंतु, सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास नसलेल्या जवळपास ५०० रुग्णांनी गृह विलगीकरणाला पसंती दिली आहे. दरम्यान, पूर्वीप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर न करता आता संबंधित रुग्णाच्या घरावर लहान आकारातील ‘कोविड-१९ पॉझिटिव्ह’ असा फलक (बोर्ड) लावण्यात येत आहे.अलीकडच्या काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, गृह विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांवर आरोग्य विभागाने १४ दिवस वॉच ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिलेल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह; परंतु सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास न जाणवणाऱ्या तसेच घरातच स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची व्यवस्था असलेल्या आणि स्वत:साठी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करणाऱ्या रुग्णांना ‘गृह विलगीकरणा’चा पर्याय जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. सध्या ५०० रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाच्या घरावर लहान आकारातील ‘कोविड-१९ पॉझिटिव्ह’ असा फलक (बोर्ड) लावण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. जिल्ह्यात केवळ दोन खासगी कोविड रुग्णालयजिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय याबरोबरच रिसोड, वाशिम, कारंजा व मंगरूळपीर येथे सरकारी कोविड केअर रुग्णालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय दोन खासगी कोविड रुग्णालय आहे. यापूर्वी पाच खासगी कोविड रुग्णालयाची सुविधा उपलब्ध होती.

अनेक कोरोनाबाधित रुग्णांना सौम्य लक्षणे, कोणताही त्रास जाणवत नाही. आवश्यक त्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या जवळपास ५०० रुग्णांनी गृृह विलगीकरणाचा पर्याय निवडला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेण्यात येतो.- डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या