शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ४६ सेंद्रिय शेती गटांची होणार निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 14:29 IST

वाशिम : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत सन २०१९-२० या वर्षात जिल्ह्यातील ६ तालुक्यातून ४६ सेंद्रिय गटांची निवड करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे एका शेतकºयास १ एकर व जास्तीत जास्त २.५ एकर पर्यंत लाभ घेता येईल. गटात समाविष्ठ होणाºया शेतकºयांकडे किमान २ पशुधन असावे. तीन वर्षे सेंद्रिय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत सन २०१९-२० या वर्षात जिल्ह्यातील ६ तालुक्यातून ४६ सेंद्रिय गटांची निवड करण्यात येणार आहे. याकरिता इच्छुक शेतकरी, सेंद्रिय शेती गटांना ६ जून २०१९ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अथवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याकडे प्रस्ताव सादर सादर करावे लागणार आहेत.सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी ४६ गटांची निवड केली जाणार आहे. गटात भाग घेणाº्या शेतकº्यांनी तीन वर्षे सेंद्रिय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक राहणार आहे. एका शेतकºयास १ एकर व जास्तीत जास्त २.५ एकर पर्यंत लाभ घेता येईल. रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते वापरणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे.  यापूर्वी सेंद्रिय शेती कार्यक्रमात भाग घेतलेले शेतकरी गट, एका गावातील पूर्ण गट हा महिलांचा होत असल्यास त्यांना प्राधान्य राहणार आहे. आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या गट अथवा समूह शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती गट, संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य यांनी संसद ग्राम योजने अंतर्गत निवडलेल्या गावांमधील गटांना प्राधान्य राहणार आहे. गटात समाविष्ठ होणाºया शेतकºयांकडे किमान २ पशुधन असावे. कोरडवाहू व बागायती क्षेत्राचे स्वतंत्र गट करावे लागणार आहेत. प्रत्येक लाभार्थ्याने दरवर्षी माती, पाणी तपासून घेणे बंधनकारक राहणार आहे. इच्छुक शेतकरी गटांनी ६ जून २०१९ पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अथवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याकडे सादर सादर करावे, असे आवाहन ‘आत्मा’ कार्यालयाच्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती