शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे विद्युत पथदिव्यांची ४४ कोटींची थकबाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 02:09 IST

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीमधील पथदिव्यांच्या एकूण ७६४ जोडण्या असून, संबंधित ग्रामपंचायतींकडे ४४ कोटी ३ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, मार्चअखेर ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने ‘शून्य थकबाकी’ ही मोहीम हाती घेतली असून, या अंतर्गत ग्रामपंचायतींना नोटीस बजावून वीज देयक अदा करा; अन्यथा वीज जोडणी खंडित करू, असा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे ग्रामपंचायतींना बजावल्या नोटीस वीज जोडणी खंडित करण्याचा इशारा 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीमधील पथदिव्यांच्या एकूण ७६४ जोडण्या असून, संबंधित ग्रामपंचायतींकडे ४४ कोटी ३ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, मार्चअखेर ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने ‘शून्य थकबाकी’ ही मोहीम हाती घेतली असून, या अंतर्गत ग्रामपंचायतींना नोटीस बजावून वीज देयक अदा करा; अन्यथा वीज जोडणी खंडित करू, असा इशारा देण्यात आला आहे.ग्रामविकास विभागातर्फे ८ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ‘अति-तत्काळ’ असा शेरा असलेले पत्र देण्यात आले असून, थकबाकी वसूल करण्याकडे लक्ष द्यावे, अशी  सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कधीही पथदिव्यांच्या वीज पुरवठा खंडित करू शकते. गैरसोय टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून थकबाकीचा भरणा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील महावितरणच्या ग्राहकांकडे वीजबिलापोटी असलेली थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी महावितरण ‘शून्य थकबाकी’ ही मोहीम आक्रमकतेने राबवित आहे. घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसोबतच सार्वजनिक पाणी पुरवठा योजना, पथदिवे यांच्यावर वीजबिलापोटी असलेल्या चालू आर्थिक वर्षातील संपूर्ण थकबाकीसोबतच मागील आर्थिक वर्षातील थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने जानेवारीपासून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले असून, थकबाकीदार ग्राहकांनी त्यांच्याकडील चालू वीज बिल आणि थकबाकीचा त्वरित भरणा करून वीज पुरवठा खंडित केल्याने होणारी गैरसोय टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :washimवाशिम