रिसोड: येथील प्रोफ्रेसर कॉलनीमध्ये अज्ञात चोरटयांनी घरफोडी करुन पाच लाखाचा ऐवज लंपास केला ही घटना आज ६ सप्टेंबरच्या पहाटे उघडकीस आली. स्थानिक प्रोफेसर कॉलनीमधील रहिवासी सेवानवृत्त कृषीअधिकारी संजय उकळकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे शहरात दहशत पसरली आहे धक्कादायक बाब म्हणजे चोरी घडली त्यावेळी उकळकर दाम्पत्य घरातच झोपलेले होते. तरी सुद्धा चोरटयांनी मोठया शि ताफीने ही चोरी केली. याबाबत प्राप्त माहितीनुसार संजय उकळकर यांच्या घरी अज्ञात चोरटयांनी शुक्रवारच्या मध्यरात्री प्रवेश करुन ४.२२ लाखाचा सोन्याचा ऐवज घेउन पोबारा केला. उकळकर यांचे कुटूंब नित्यनेमाप्रमाणे समोरील बेडरुममध्ये झोपले होते. या संधीचा चोरटयांनी फायदा घेत किचनरुम लगत असलेल्या आतील प्रवेशव्दाराचे चॅनल गेट चे लॉक तोडून आत प्रवेश केल्याचे समोर आले आहे. चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये सौभाग्य पोथ ३८ ग्रॉम, पोथ २७ ग्रॅम, छोटी पोथ १२ ग्राम राणीहार ३६ ग्रूम, कंठी २५ ग्रॅम, नेकलेस १२ ग्रॅम, काणातील फुले ६ ग्रॅम , मणी २ ग्रॅम, याशिवाय इतर सोन्याचे दागीनन्या चोरटयांनी हात साफ केला. एवढयात शहरात चोरीच्या वाढत्या घटनांनी व्यापारी वर्गासह सर्वच नागरिकांची चिंता वाढली आहे. भरदिवसा उच्चभू वस्तीतल घराची हेरगिरी करुन रात्रीच्या वेळ घरात चोरी केल्या जात आहे. या कामात लहान मुलांसह महिलांचा सुद्धा आधार घेतल्या जातो. चोरटे हे चोरी करिता अत्याधुनिक यंत्रणेचाही वापर करत असल्याचे यापुर्वी झालेल्या चोरीतून स्पष्ट झाले आहे. बाजारात नव्यानेच आलेल्या एका मायक्रो कॅमेर्याचा चोरीसाठी वापर करण्यात येत असल्याची माहिती आहे. पोलिसांनीही या शक्यतेला दुजोरा दिला आहे. या चोरीच्या घटनेचा छडा लवकरात लवकर लागावा अशी मागणी आहे. आज झालेल्या चोरीच्या तपासाकरीता वाशिम वरुन श्वान पथक, ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. प्रथमदर्शनी सुगाव्यावरुन पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेवून सखोल तपास सुरु केला आहे. चोरीची घटना डघडकीस येताच रात्रीपासून ठाणेदार सुरेशकुमार राउत, सहाय्यक पो.नि.संजय गवई, पो.उ प.नि.कांबळे, नरुटे आदी पोलिस कर्मचारी चोरांचा कसून शोध घेत आहेत स्थानिक गुन्हे शा खेच्या ताफा सुद्धा तपास कामावरील शहरात दाखल झाला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल आहे.
रिसोड येथे ४.२२ लाखांची चोरी
By admin | Updated: September 7, 2014 03:05 IST