वाशिम : धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या व काम सुरु न झालेल्या सिंचन विहिरींसाठी मुदतवाढ देवूनही कामे सुरू न झाल्यामुळे जिल्ह्यातील ४00 च्या आसपास विहिरी रद्द ठरविण्याची कार्यवाही करण्यात आली. याबाबत माहिती देताना रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी सांगितले, की धडक सिंचन विहीर योजनेतून ४७६ सिंचन विहिरींची कामे सुरु करण्यात आली होती. मात्र, अनेक पात्र लाभार्थ्यांनी विहिरींचे काम सुरु न केल्याने या सिंचन विहिरी रद्द करण्याचे प्रस्तावित होते. त्यास मध्यंतरी मुदतवाढ देखील देण्यात आली होती. मात्र, लाभार्थ्यांनी त्यानंतरही कामे पूर्ण न केल्यामुळे सिंचन विहिरींचे कामे रद्द ठरविण्यात आली, असे कोरडे यांनी सांगितले.
४00 विहिरी ठरल्या रद्द!
By admin | Updated: May 8, 2017 01:22 IST