संतोष वानखडे / वाशिम: सहकार क्षेत्रात केवळ नोंदणीपुरत्या र्मयादित राहणार्या जिल्ह्यातील ३८४ सहकारी संस्था अवसायनात काढण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केली. सहकार क्षेत्रात ह्यबिनकामाह्णच्या असलेल्या १0६ संस्थांची नोंदणी रद्द केल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. अर्थव्यवस्थेला बळकटी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यात सहकारी संस्थांची मोलाची भूमिका आहे. या दृष्टिकोनातून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून सहकारी संस्थांचे जाळे विणले जाते. वाशिम जिल्ह्यातही अशा संस्थांचे जाळे विणले गेले आहे. मात्र, काही संस्था केवळ नोंदणीपुरत्या र्मयादित राहत असल्याने कार्यालयीन कामकाजावर या संस्थांचा अतिरिक्त बोजा पडतो. बंद किंवा कार्यस्थगित सहकारी संस्थांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात जुलै ते नोव्हेंबरदरम्यान उपनिबंधक कार्यालयाने सर्वेक्षण मोहीम राबविली. या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जिल्ह्यात वाशिम तालुका २८३, रिसोड १३७, मालेगाव १३५, मंगरुळपीर १५६, कारंजा १४८ व मानोरा ५९ अशा एकूण ९१८ सहकारी संस्था आहेत. यापैकी अनेक संस्था सहकारात सक्रिय नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. सहकारात निष्क्रिय असलेल्या तब्बल ३८४ सहकारी संस्था अवसायनात काढण्याची कार्यवाही उपनिबंधक कार्यालयाने केली. या वृत्ताला जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दुजोरा दिला. संस्था नोंदणी करताना दिलेल्या पत्त्यावर उपनिबंधक कार्यालयाने पाहणी केली असता, तेथे अनेक संस्था आढळून आल्या नाहीत. जवळपास ११ ते १८ संस्थांचा ठावठिकाणा लागला नाही. परिणामी, यामधील काही संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली. बंद असणार्या तसेच कार्यस्थगित असणार्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही अद्यापही सुरू असून, मार्च २0१६ अखेरीस हा आकडा २५0 च्या आसपास जाण्याचा अंदाज विश्वसनीय सूत्राने वर्तविला. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले.
३८४ सहकारी संस्था अवसायनात
By admin | Updated: January 22, 2016 01:50 IST