शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

३५ शाळांना शुल्क परतावा; पाच प्रस्तावांची फेरचौकशी !

By admin | Updated: June 2, 2017 15:32 IST

शुल्क परतावा मिळण्यासाठी ४० शाळांनी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले.

वाशिम - खासगी शाळेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिल्यानंतर, शुल्क परतावा मिळण्यासाठी ४० शाळांनी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले. यापैकी ३५ शाळांना शुल्क परताव्याची रक्कम देण्यात आली तर पाच शाळांच्या प्रस्तावांची फेरचौकशी सुरू झाली.शिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यातून विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. या प्रवेशाचे शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना वितरित केले जाते. यासाठी संबंधित शाळांकडून प्रस्ताव मागविले जातात. सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील एकूण ४० शाळांनी शैक्षणिक शुल्काच्या प्रतीपूर्तीसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. मध्यंतरीच्या कालावधीत शासनाकडून निधीच मिळाला नसल्याचे निधीचे वितरण होऊ शकले नाही. काही महिन्यांपूर्वी निधी प्राप्त झाल्याने निधीचे वितरण करावे, अशी मागणी संस्था चालकांनी शिक्षण विभागाकडे केली. दरम्यानच्या काळात संस्था चालकांनी जिल्हा परिषदेवर धडक देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती पहिल्या शैक्षणिक सत्रातील शुल्क संस्थाचालकांना तातडीने वितरित करण्याच्या सूचना गणेश पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, या प्रस्तावांची छानणी केली असता, ग्रामीण भागातील पाच शाळांनी शहरी भागापेक्षाही अधिक शुल्क दाखविल्याचे समोर आले. पुरेशा प्रमाणात भौतिक व अन्य सुविधा उपलब्ध नसतानाही, या शाळांनी शहरी भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षाही जास्त शुल्क दाखविल्याने पाटील यांनी या शाळांच्या प्रस्तावांच्या फेरचौकशी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार पाच शाळांच्या प्रस्तावांची फेरचौकशी केली जात असल्याचे शिक्षणाधिकारी मानकर यांनी सांगितले. उर्वरीत ३५ शाळांना सन २०१४-१५ या सत्रातील शुल्काचा परतावा बँक खात्यामार्फत करण्यात आल्याचेही मानकर यांनी स्पष्ट केले.