शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

दुर्धर आजारग्रस्तांच्या ३५ प्रस्तावांना मान्यता!

By admin | Updated: September 6, 2016 02:01 IST

लोकमत वृत्ताची दखल घेऊन एप्रिल ते जून दरम्यानच्या ५0 पैकी ३५ प्रस्तावांना मान्यता दिली.

संतोष वानखडे वाशिम, दि. ५: जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार्‍या १५ हजार रुपयांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील ५७ दुर्धर आजारग्रस्त लाभार्थींंचे प्रस्ताव बैठकीअभावी रखडल्याचे वृत्त 'लोकमत'ने २५ ऑगस्टच्या अंकात प्रकाशित करताच, प्रशासनाने तातडीने हालचाली करून ३ सप्टेंबरला बैठक घेतली. एप्रिल ते जून दरम्यानच्या ५0 पैकी ३५ प्रस्तावांना मान्यता दिली असून, त्रुटींमुळे २0 प्रस्ताव बाद ठरले. यापुढे दरमहा बैठक घेण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी दिल्या.जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून औषधोपचारासाठी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्रय़रेषेखालील कर्करोग, हृदयरोग व किडनीग्रस्त अशा ५७ रुग्णांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर केले. दर तीन महिन्यांनी होणार्‍या सभेत या प्रस्तावांना मंजुरात मिळणे अपेक्षित आहे. एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यात जिल्हाभरातून ५७ प्रस्ताव आरोग्य विभागाला प्राप्त झाले; मात्र जूनच्या अखेरीस आणि त्यानंतर जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात पदाधिकार्‍यांची निवडणूक झाली. परिणामी, जुलै महिन्यात होणारी आरोग्य समितीची बैठक लांबणीवर पडली. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांना बैठक लावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ३ सप्टेंबर रोजी बैठक झाली असून, यावेळी एप्रिल ते जून २0१६ या कालावधीतील एकूण ५५ प्रस्तावावर चर्चा झाली. परिपूर्ण असलेल्या ३५ प्रस्तावांना मान्यता दिली असून, त्रुटींमुळे २0 प्रस्ताव बाद ठरले. दरम्यान, राज्य शासनाने नमूद केलेल्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र सादर करणे काही वेळा कठीण होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जबाबदार डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणणे वाशिम जिल्ह्यातील रुग्णांना गैरसोयीचे ठरते. वाशिम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाच्या सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे, अशी सूचनाही यावेळी हर्षदा देशमुख यांनी केली. यासंदर्भाचा मुद्दा येत्या सर्वसाधारण सभेत चर्चेत ठेवावा, असे निर्देशही देशमुख यांनी आरोग्य अधिकार्‍यांना दिले.दरमहा बैठकदुर्धर आजारग्रस्तांचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी दर तीन महिन्यांनी बैठक घेतली जाते. यामध्ये बराच कालावधी जातो. प्रस्ताव मंजुरातीपूर्वीच एखाद्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला, तर १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळत नाही. संबंधित रुग्णांना उपचारासाठी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य तातडीने मिळावे, यासाठी दरमहा बैठक घेण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडावा. याला सर्वसाधारण सभेची मंजुरात घेऊन दरमहा बैठक घेण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.