शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ३५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्य टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:51 IST

वाशिम: जिल्ह्यात ३ मध्यम आणि १२८ लघू, असे एकंदरित १३१ प्रकल्प असून, निम्म्या प्रकल्पांमधील पाणीसाठा १0 टक्क्यांपयर्ंत घटला आहे. काही प्रकल्पांची पाणीपातळी तर शून्यावर आल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे२९ प्रकल्पात १0 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठारब्बी हंगाम धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात ३ मध्यम आणि १२८ लघू, असे एकंदरित १३१ प्रकल्प असून, निम्म्या प्रकल्पांमधील पाणीसाठा १0 टक्क्यांपयर्ंत घटला आहे. काही प्रकल्पांची पाणीपातळी तर शून्यावर आल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात एकबूर्जी, सोनल आणि अडाण असे तीन मध्यम प्रकल्प असून, १२८ लघू प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यातील तब्बल ३५ प्रकल्पांची पाणीपातळी आजमितीस शून्यावर पोहोचली आहे; तर २९ प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, उर्वरित प्रकल्पांमधील पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत पुरायला हवे, याबाबत पूर्वनियोजन म्हणून पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले असून, सिंचनाकरिता पाणी सोडणे सक्तीने बंद करण्यात आले आहे. परिणामी, सिंचन प्रकल्पांमधील पाण्याच्या भरोशावर शेती कसणार्‍या शेतकर्‍यांसमोर बिकट संकट उभे ठाकले आहे. यामुळेच तोंडावर असलेला रब्बी हंगाम पूर्णत: धोक्यात सापडला आहे. 

सिंचनाकरिता पाणी मिळण्याबाबत संतप्त शेतकरी धडकले लघु पाटबंधारेच्या कार्यालयावर!सिंचन प्रकल्पात पाणी असूनही ते रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी मिळणे दुरापास्त झाल्यामुळे नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. ही बाब लक्षात घेऊन अडोळ सिंचन प्रकल्पातील पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी असंख्य शेतकर्‍यांनी सोमवारी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांच्याशी चर्चा केली. अडोळ प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता १२.८९ दलघमीची असून, आजमितीस या प्रकल्पात २.७६ दलघमी पाणी शिल्लक आहे. तेदेखील पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून, या प्रकल्पावरून रिसोड शहरासह काही खेड्यांना पाणी पुरविले जात आहे; मात्र ज्या शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या, त्यांना पाणी मिळेनासे झाल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी करून किमान हरभरा पिकासाठी पाणी पुरविण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. दरम्यान, यावर्षी पर्जन्यमान घटल्यामुळे पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य दिले जात असून, सिंचनाकरिता पाणी पुरवावे, एवढा साठा प्रकल्पात शिल्लक नसल्यामुळेच ही बाब अशक्य असल्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :Waterपाणी