शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

३४६ गावांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:50 IST

संतोष वानखडे वाशिम : प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचारांची पेरणी, गावकऱ्यांची सतर्कता आणि प्रशासनाचे परिश्रम या ...

संतोष वानखडे

वाशिम : प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचारांची पेरणी, गावकऱ्यांची सतर्कता आणि प्रशासनाचे परिश्रम या बळावर जिल्ह्यातील तब्बल ३४६ गावांनी दुस-या लाटेत कोरोनावर मात केली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठीदेखील आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर राहणार आहे.

जिल्ह्यात गतवर्षी ३ एप्रिल रोजी मेडशी (ता. मालेगाव) या ग्रामीण भागातच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण कोरोनाबाधित रुग्ण ७,१४३ होते. यापैकी ६,८३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर १५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुस-या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारावर रुग्ण आढळून असून यापैकी ३०,४९० जणांनी कोरोनावर मात केली तर ४२४ जणांचा उपचारादरम्या मृत्यू झाला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुसरी लाट ओसरत असून, जून महिन्यात तर रुग्णसंख्याही दोन अंकी येत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. दुस-या लाटेत जिल्ह्यातील ६८७ गावांत कोरोना रुग्ण आढळून आले. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांची सतर्कता, सकारात्मक विचार, आरोग्य, पोलीस, महसूल, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनातील प्रत्येक घटकांचे परिश्रम या बळावर ७ जूनपर्यंत ३४६ गावांतील रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३४१ गावांत सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने गावात १०० टक्के लसीकरण करणे, कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यावर ग्रामपंचायतींनी भर दिल्याचे दिसून येते.

.....

प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर राहणार

कोट बॉक्स

खरोळा गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नागरिकांचादेखील सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने सध्या गावात एकही सक्रिय रुग्ण नाही. यापुढेही १०० टक्के लसीकरण, आरोग्यविषयक जनजागृती, नियमित स्वच्छता यावर भर राहणार आहे.

- दीपक खडसे,

सरपंच खरोळा

....

गावात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली तसेच नियमित स्वच्छता, धूर फवारणी करण्यावर भर राहणार आहे. येत्या काळात १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण कसे पूर्ण होईल, या दृष्टिकोनातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नियोजन केले जात आहे. आरोग्यविषयक जनजागृती केली जात आहे.

- मनीषा रमेश अंभोरे

सरपंच, चिखली

..........

साखरा गावात सध्या एकही सक्रिय रुग्ण नसून, गावाने कोरोनावर मात केली आहे. यासाठी प्रशासनाचे परिश्रम आणि नागरिकांचे सहकार्य मोलाचे ठरले. यापुढेही गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नागरिकांचे १०० टक्के लसीकरण, जनजागृती केली जाणार आहे.

- चंद्रकला इंगळे, सरपंच साखरा

०००००००००००००००००००००

धोका अजून टळला नाही; खबरदारी घ्यावी!

कोट बॉक्स

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे, ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. ग्रामीण भागात सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे. कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे यापुढेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.

- शण्मुगराजन एस.

जिल्हाधिकारी, वाशिम

.....

ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. वेळोवेळी आढावा घेतला जात असून, कोरोना नियंत्रणासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा चांगली कामगिरी बजावत आहेत. कोरोनाविषयक त्रिसूत्रीचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे.

- वसुमना पंत,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वाशिम

......

ग्रामीण भागातही कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना चाचण्या, लसीकरण, जनजागृती यावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.

- डॉ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.

००००००००००००

पहिल्या व दुस-या लाटेतील एकूण रुग्णसंख्या

प्रकारपहिली लाट दुसरी लाट

(एप्रिल-जानेवारी)(फेब्रु.-मे २०२१)

एकूण रुग्ण ७१४३ ३२९१९

सक्रिय रुग्ण १५३ २००५

डिस्चार्ज ६८३६ ३०४९०

मृत्यू १५४ ४२४

..........

अशी आहे तालुकानिहाय आकडेवारी

तालुकाकोरोनाबाधित गावेकोरोनामुक्त गावे

वाशिम ४४ ७६

रिसोड ५५ ४५

मालेगाव ५० ६४

मंगरूळपीर १११ ०५

मानोरा २८ ८८

कारंजा ५३ ६८

एकूण ३४१ ३४६