मंगरूळपीर: आसेगाव व मंगरूळपीर पोलीस स्टेशन अंर्तगत येणार्या तालुक्यातील ३१ गावात ह्यएक गाव एक गणपतीह्ण ही संकल्पना अंमलात आणली असून हा गणेश उत्सव मोठय़ा आनंदात साजरा करण्यात येत आहे.गावात एकोपा रहावा व उत्सवाच्या काळात गावात शांतता नांदावी या हेतुने ेमहात्मा गांधी ग्राम तंटामुक्त समितीच्या माध्यमातून विविध धार्मिक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जातात, त्याचाच एक भाग गणेश उत्सव यंदा तालुक्यातील ३१ गावात ह्यएक गाव एक गणपतीह्णची स्थापना करण्यात आली आहे. मंगरूळपीर पोलीस स्टेशन अंर्तगत येत असलेल्या हिसई, सायखेडा, धानोरा, मसोला,निंबी,चिंचाळा,शिवनी रोड, मोझरी, झाडगाव, दाभा, बालदेव, इचा, धोत्रा, पोघात, कंझरा, मानोली, शेंदुरजना मोरे, लावणा, जांब, कोठारी, पेडगाव, पिंपळखुटा आणि अजनी तर आसेगाव पोलीस स्टेशन अंर्तगत येणार्या तालुक्यातील १२ गावापैकी ८ गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली. यामध्ये धानोरा, सनगाव, मसोला, वसंतवाडी, पिंपळगाव इजारा, दस्तापूर, लही व मोतसावंगा या गावाचा समावेश आहे. तालुक्यात ४३ गावात मंडळांनी गणेश मुर्तीची स्थापना केली आहे. हा उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
३१ गावात ‘एक गाव एक गणपती’
By admin | Updated: September 4, 2014 00:24 IST