रहदारीस अडथळा जाणवू नये यासाठी वाशिम शहरातील महात्मा फुले संकुलानजीक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र त्याठिकाणी कोणीच वाहने ठेवत नाही. यामुळे पाटणी चौक या सदैव नागरिकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या ठिकाणी रहदारी दिवसभरातून अनेकवेळा विस्कळीत होते. दंडात्मक कारवाईची तरतूद असतानाही अनेक वाहनांवर ट्रिपल सीट वाहतूक केली जात आहे. विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दुचाकी वाहन चालवत असताना मोबाइलवर बोलणे टाळावे, असे आवाहन वेळोवेळी केले जाते; मात्र त्याकडे काणाडोळा करून अनेकजण आजही वाहन चालवत असताना मोबाइलवर संभाषण करताना दिसून येत आहेत. वेगमर्यादा ठरवून दिल्यानंतरही भरधाव वेगात वाहने चालविली जातात. अशाच स्वरूपातील नियम मोडल्याप्रकरणी शहर वाहतूक विभागाने २०२० या वर्षांत ५०० वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यातील ३०८ लोकांनी मात्र आकारलेला दंड भरला नसल्याची माहिती प्राप्त झाली.
..................
२०२०
--------
७०८
जणांवर कारवाई
१,१०,०००
आकारलेला दंड
.........................
अशी आहे आकडेवारी
नो पार्किंग - १००/७०
ट्रिपल सीट - १५०/१२०
विनापरवाना - १३३/२५
मोबाइलवर बोलणे - १९५/५४
अधिक वेग - १३०/४९
..................
..तर वाहन परवाना रद्द
शासनाने घालून दिलेल्या वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियम तोडणाऱ्यांकडून ठरावीक दंड वसूल केला जातो. तो निर्धारित मुदतीत अदा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. याबाबत वेळोवेळी सांगूनही अनेक वाहनचालक नियमांना वाकुल्या दाखवत आहेत.
..................
कोट :
वाशिम शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, रहदारीस अडथळा जाणवू नये यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत; मात्र दंडात्मक कारवाई करूनही अनेकजण नियम पाळत नाहीत किंवा आकारलेला दंड भरत नसल्याचे प्रकार घडत आहेत.
- नागेश मोहोड
निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, वाशिम