शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील २८८ युवक आत्मनिर्भर; १६.७९ कोटी रुपयांचे कर्जवाटप

By दिनेश पठाडे | Updated: March 13, 2023 15:31 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २८८ युवकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून बँकांनी १६ कोटी ७९ लाख १० हजार ४६३ रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

वाशिम : मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, युवक सक्षम बनावेत यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत विविध व्यवसायासाठी कर्जपुरवठा केला जातो. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर महामंडळाकडून व्याज परतावा दिला जातो. त्यामुळे कर्जदारांना केवळ मुद्दल भरावी लागत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८८ युवकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून बँकांनी १६ कोटी ७९ लाख १० हजार ४६३ रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, व्यवसायामध्ये उभारी घेता यावी, यासाठी वैयक्तिक कर्ज योजना राबविली जाते. या अंतर्गत युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याने युवकांना व्यवसाय उभारता येत आहे. यापूर्वी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाख होती. 

महामंडळाचे कर्ज घेणाऱ्यांचे वाढते प्रमाण, नियमित कर्जफेड करणाऱ्यास मिळणार प्रतिसाद लक्षात घेऊन महामंडळाने व्याज परतावा योजनेची मर्यादा  १५ लाखापर्यंत केली आहे. या अंतर्गत व्याज परतावा ४ लाख ५० हजार मर्यादेत केला जात आहे. जिल्ह्याला २०२२-२३ या आर्थिक वर्षात किमान ३०० कर्जप्रकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २८८ जणांना कर्जवाटप करण्यात आले आहे. महामंडळामार्फत कर्जाचा लाभ घेण्यासाठी ८१७ जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी २८८ लाभार्थींना त्या-त्या बँकेकडून कर्ज मिळाले. बँकेत असलेले प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना महामंडळाने दिल्या आहेत.

१.६४ कोटींचा व्याज परतावाअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून पंधरा लाख रुपये कर्जापर्यंत व्याज परतावा ४ लाख ५० हजार रुपये मर्यादेपर्यंत केला जातो. आतापर्यंत महामंडळाने व्याज परताव्यापोटी १ कोटी ६४ लाख ५९ हजार ९८२ रुपये बँकांना अदा केले आहेत. 

टॅग्स :washimवाशिम