वाशिम : जिल्हा परिषद कृषी विभागाच्या विशेष घटक योजना व आदिवासी उपयोजनेंतर्गत सन २0१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील तब्बल २७२९ लाभार्थींंची निवड झाली असून, पंचायत समिती स्तरावर लाभार्थींंच्या याद्या प्रकाशित करण्याच्या सूचना कृषी सभापती सुभाष शिंदे यांनी दिल्या. अनुसूचित जाती प्रवर्ग व आदिवासी प्रवर्गातील शेतकर्यांचा जीवनस्तर उंचाविणे, शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करणे, शेतीपयोगी साहित्याचा लाभ १00 टक्के अनुदानावर देण्यासाठी अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) व आदिवासी उपयोजना अशा दोन योजना राबविल्या जातात. उपलब्ध अनुदानाच्या र्मयादेनुसार पात्र लाभार्थींंची अंतिम निवड कृषी विभागातर्फे केली जाते. जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद व इतर विभागाचे शासकीय सदस्यांनी २७२९ लाभा र्थींंची निवड केली. अपंग शेतकरी, दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेतील लाभार्थी, महिला शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी असा उतरता क्रम निवड प्रक्रियेत ठेवण्यात आला. अनुसूचित जाती उपयोजनेमध्ये २६१0 आणि आदिवासी उपयोजनेमध्ये ११९ लाभा र्थींंची निवड केली. या यादीला कृषी विषय समितीने अंतिम मंजुरात देऊन कृषी विभागाच्या सर्व अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत पंचायत समिती स्तरावर याद्या प्रकाशित करण्याचे तसेच संबंधित लाभार्थींंना निवड झाल्याचे पत्र देण्याच्या सूचना सभापती शिंदे आणि कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर यांनी केल्या. २0१५-१६ या वर्षात निवड झालेल्या लाभार्थींंना विहीर असल्यास पाइपलाइन, इलेक्ट्रिक मोटर, इंजिन, तुषार संच आदींचा प्राधान्यक्रमाने लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर बैलगाडी व बैलजोडीचा लाभ मिळणार असल्याचे सभापती शिंदे यांनी स्पष्ट केले. आदिवासी उपयोजनें तर्गत मालेगाव तालुक्यातील ४२, रिसोड २७, मंगरुळपीर १५, मानोरा १८ व कारंजा चार असे एकूण ११९ लाभार्थींंंना शेतीपयोगी साहित्याचा लाभ दिला जाणार आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत वाशिम तालुका ४४७, मालेगाव ६५६, रिसोड ६१४, मंगरुळपीर ४२३, मानोरा ११५ व कारंजा ३५५ अशा २६१0 लाभार्थींंचा समावेश आहे. आता तालुकानिहाय बैठका घेऊन लाभार्थींंंना निवड झाल्याचे आणि साहित्य घेऊन जाण्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात येणार आहे. तालुकास्तरीय बैठकांबाबत संबंधित अधिकारी, पदाधिकारी व लाभार्थींंंना पूर्वसूचना देण्याच्या सूचना सभापती शिंदे व कृषी विकास अधिकारी देवगिरकर यांनी केल्या. रिसोड तालुक्यातील हराळ, कवठा व रिठद जिल्हा परिषद सर्कलमधील जवळपास २00 पात्र लाभार्थींंंची निवड झाली.
विशेष घटक योजनेसाठी२७00 लाभार्थींंची निवड
By admin | Updated: January 7, 2016 02:26 IST