शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान घेऊन शौचालय न बांधणा-या 27 लाभार्थ्यांची पोलिसात तक्रार

By admin | Updated: December 29, 2016 15:43 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनुदान घेऊनही शौचालय न बांधणा-या लाभार्थ्यांवर नगरपालिकेने कारवार्इंचा बडगा उगारला आहे.

 ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 29 - नगर पालिकेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनुदान घेऊनही शौचालय न बांधणा-या लाभार्थ्यांवर नगरपालिकेने कारवार्इंचा बडगा उगारला आहे. शहरातील अशा 27 लाभार्थ्यांची पालिकेने पोलिसात तक्रार दिली आहे. यामुळे शौचालयाचे अनुदान घेऊन बांधकाम न करणा-या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
 
येथील नगर पालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात विविध उपक्रम राबविले, तसेच शौचालयाचे महत्व पटवून देत घरोघरी जावून मार्गदर्शन केले. याच बरोबर या अभियानांतर्गत मार्च, एप्रिल व ऑक्टोबर 2016 पूर्वी शौचालय बांधण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना तीन टप्यात अनुदान दिले. परंतु अनुदान घेऊनही शौचालय न बांधणा-या लाभार्थ्यांचा शोध पालिकेच्या अधिकारी, कर्मचा-यांनी घेतला असता.
 
आतापर्यंत 27 लाभार्थी आढळलेत.  या लाभार्थ्यांची पालिकेतर्फे पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग केल्याने या लाभार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या शहरात  स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्याच्या कार्याला वेग आला असून याकरिता नगर पालिकेचे अधिकारी कर्मचारी अथक परिश्रम घेत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.