------------------
सोयाबीनची आवक वाढली
वाशिम : रब्बी हंगामातील सिंचनाची धांदलघाई कमी झाली असून, आता पिके काढणीवर आली आहेत. यासाठी शेतकरी तजवीज करण्यात व्यस्त असून, हाती पैसा असावा या उद्देशाने त्यांनी ठेवलेल्या सोयाबीनची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांत सोयाबीनची आवक पुन्हा वाढली आहे. सोमवारी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांत मिळून ३५ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
-------------
शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे किट वितरण
वाशिम : जिल्ह्यात कृषी विभागाकडून अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना भाजीपाला बियाण्यांच्या किटचे वितरण केले जात आहे. अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत असून, सोमवारी तपोवन ग्रामपंचायत अंतर्गत सरपंचांच्या हस्ते शेतकऱ्यांना भाजीपाला बियाण्यांच्या किटचे घरोघरी जाऊन वितरण करण्यात आले.
--------