वाशिम : विधानसभा मतदारसंघात १५ ऑक्टोबरला पार पडलेल्या पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल ५७.२0 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सन २00९ च्या तुलनेत झालेली ही २.६५ टक्के वाढ नेमकी कुणाच्या पथ्यावर पडणार, अशी चर्चा आजमि तीला मतदारसंघात सुरू झाली आहे. यंदाच्या विधानसभेचा निकाल मतदानाचा वाढलेला टक्का तथा मतविभाजनाचे समीकरण यावर केंद्रित होणार असल्याचे आडाखे राजकीय जाणकारांकडून बांधले जात आहेत.वाशिम मतदारसंघात यंदा पार पडलेली निवडणूक सन २00९ च्या तुलनेत सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढविली. २00९ मध्ये दोन लाख ७२ हजार 0५ मतदारांपैकी एक लाख ५१ हजार २२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये भाजपने ६५ हजार १७४, तर काँग्रेसने ४0 हजार ९४५ मते घेतली होती. त्यावेळीही मताचे विभाजन करण्यात अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या महादेव ताटके व समाधान माने निर्णायक ठरले होते. दोन्ही अपक्षांनी मिळून ३६ हजार ४९ मते घेतली होती. सन २0१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्यामुळे मतविभाजन अटळ आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी-बिघाडी झाल्यामुळे दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व काँग्रेसी विचारधारेच्या मतांमध्ये उभी फूट पडली आहे. भाजप व शिवसेना युतीमधील घटस्फोटामुळेही मोठय़ा प्रमाणात मतविभाजन झाले आहे. त्यातच मनसेने दोन्ही बाजूंच्या म तविभाजनाचा फायदा उचलण्याचा जोरकस प्रयत्न केला आहे. अपक्ष उमेदवारांचा निवडणुकीतील सहभाग मतांचा टप्पा कितपत गाठते, हेही महत्त्वाचे ठरणारे आहे.
वाढलेले २.५६ टक्के मतदान पडणार कुणाच्या पथ्यावर ?
By admin | Updated: October 17, 2014 00:44 IST