शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २५२ गावांची निवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 16:45 IST

वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील २५२ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये ३ हजार १२३ कामे होणार आहेत. आतापर्यंत ३६२ कामे पूर्ण झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील २५२ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये ३ हजार १२३ कामे होणार आहेत. आतापर्यंत ३६२ कामे पूर्ण झाली आहेत.राज्याच्या काही भागात दर दोन वर्षांनी  या-ना-त्या कारणांनी निर्माण होणाºया टंचाईवर मात करण्यासाठी राज्यात ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही नाविण्यपूर्ण योजना राबविली जात आहे. अपुºया आणि अनियमित पावसामुळे टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम होतो. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी ही परिस्थिती बदलण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या विविध कामांवर भर दिला जात आहे. पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणेख सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदि जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे, जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे आदींना प्राधान्य दिले जाते. जिल्ह्यात सन २०१८-१९ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २५२ गावांची निवड करण्यात आली आहे. २५२ गावांत जलसंधारणाची एकूण ३ हजार १२३ कामे होणार आहेत. आतापर्यंत ३६२ कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभागाने संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार