शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २५ शाळा एकशिक्षकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST

शासनाच्या मिशन ब्लॅक बोर्ड या उपक्रमांतर्गत नव्वदच्या दशकांत शाळा द्विशिक्षकी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु गेल्या काही वर्षांत ...

शासनाच्या मिशन ब्लॅक बोर्ड या उपक्रमांतर्गत नव्वदच्या दशकांत शाळा द्विशिक्षकी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु गेल्या काही वर्षांत शाळांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आकर्षित होणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे शासकीय व मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली. विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे, तसेच अनेक वर्षांपासून शिक्षक भरती न केल्यामुळे पुन्हा एकशिक्षकी शाळा निर्माण झाल्या. वाशिम जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांची संख्या १,४२०च्या वर आहे. त्यात प्राथमिक शाळांची संख्या लक्षणीय असून, गावागावांत खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्याने, शासकीय मराठी शाळांतील विद्यार्थी संख्येत घट झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २५ शाळा एकशिक्षकी असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्यातील १० पेक्षा अधिक शाळांत विद्यार्थ्यांची पटसंख्या १० पेक्षाही कमी असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत असून, सामाजिक व भौगोलिक कारणांमुळे या शाळा द्विशतकी करणे शक्य होऊ शकले नाही.

----------------

इंग्रजी शाळांकडे कल

गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमांच्या शाळांत पाल्याचा प्रवेश करण्याकडे पालकांचा कल वाढला असून, इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आकर्षित होणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे शासकीय व मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली. विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे, तसेच अनेक वर्षांपासून शिक्षक भरती न केल्यामुळे पुन्हा एकशिक्षकी शाळा निर्माण झाल्या. परिणामी, शासकीय मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे शाळा द्विशतकी करण्यात अडचणी येत आहेत.

--------------

कोट: एकशिक्षकी शाळा द्विशिक्षकी करण्यात विविध अडचणी आहेत. त्यात पटसंख्या कमी असणे, तसेच शिक्षकांच्या निवृत्तीमुळे पदे रिक्त होणे, या प्रमुख अडचणी आहेत, शिवाय नवी शिक्षक भरतीही एवढ्यात झाली नाही. तथापि, पर्यायानुसार टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एकशिक्षकी शाळा द्विशिक्षकी करण्यात येतील.

-गजाननराव डाबेराव

प्रभारी उपशिक्षणाधिकारी,

जि.प. वाशिम

----------

जिल्ह्यातील एकशिक्षकी शाळा,

तालुका एकशिक्षकी शाळा

कारंजा - ०७

मालेगाव - ०३

मंगरुळपीर - ०३

मानोरा - ०५

रिसोड - ०४

वाशिम - ०३