शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास सेवा; तरीही लसीकरण नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:41 IST

वाशिम : कोरोनाकाळात २४ तास सेवा देऊनही लसीकरणासंदर्भात मेडिकल संचालकांसोबत दुजाभावाची वागणूक मिळत आहे. कोविड योद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या ...

वाशिम : कोरोनाकाळात २४ तास सेवा देऊनही लसीकरणासंदर्भात मेडिकल संचालकांसोबत दुजाभावाची वागणूक मिळत आहे. कोविड योद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने संपूर्णत: दुर्लक्ष केले असून केंद्र व राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत औषधी विक्रेत्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात यावे, अन्यथा संपावर जाण्याचा इशारा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे राज्याध्यक्ष जगन्नाथ शिंदे व वशिम जिल्हाध्यक्ष राजेश पाटील सिरसाट, सचिव नंदकीशोर झंवर यांनी दिला आहे.

संपूर्ण देशात व राज्यात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला असून औषधी विक्रेता व त्यांचे कर्मचारी स्वत:च्या जिवावर उदार होऊन २४ तास सेवा देत आहेत. औषधी विक्रेत्यांमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत राहण्यात मोठी मदत होत आहे. कोरोना रुग्ण तसेच नातेवाइकांसोबत औषधी विक्रेत्यांचा जवळून संपर्क येतो. असे असतानाही औषधी विक्रेते सेवा देत आहेत. कोरोनाकाळातील ही सेवा लक्षात घेता औषधी विक्रेत्यांना लसीकरणात प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप लसीकरणास प्राधान्य देण्यात आले नाही. सरकारच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करीत लसीकरणात प्राधान्य द्यावे, अन्यथा संपावर जाण्याचा इशारा औषध विक्रेता संघटनेने दिला.