शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

मत्स्य शेतीसाठी लवकरच कार्यान्वित होणार २१ योजना!

By admin | Updated: April 14, 2017 02:29 IST

वाशिम : शेतीला जोडधंदा म्हणून विविध व्यवसायांची जोड देण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने नीलक्रांती धोरण निश्चित केले.

नीलक्रांती: शासन देणार ५० टक्के अनुदान

वाशिम : शेतीला जोडधंदा म्हणून विविध व्यवसायांची जोड देण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने नीलक्रांती धोरण निश्चित केले असून, या धोरणांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या ५० टक्के अर्थसहाय्याच्या २१ योजना राज्यात राबविल्या जाणार आहेत, अशी माहिती मत्स्य व्यवसाय विभाग वाशिमचे सहाय्यक आयुक्त सु. ना. सुखदेवे यांनी दिली.शेतीला जोडधंदा म्हणून तसेच मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या नीलक्रांती धोरणांतर्गत ५० टक्के अर्थसहाय्याच्या २१ योजना राज्यात राबविण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाच्या ६ मार्च २०१७ रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे. यानुसार या योजनेच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त सुखदेवे यांनी दिली.केंद्र शासनाने नीलक्रांती धोरणांतर्गत मत्स्य व्यवसायाच्या वाढीसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार राज्यातील भू-जलाशयीन, सागरी व निमखारे पाणी क्षेत्रातील जलाशये राज्यांतील नैसर्गिक साधन संपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करून शाश्वत पद्धतीने जैविक सुरक्षितता व पर्यावरणीय समतोल राखून मत्स्योत्पादनात वाढ करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या धोरणाला अनुसरुन मत्स्य विभागाकडून ५० टक्के अर्थ सहाय्याच्या २१ योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेमध्ये जलाशयांच्या क्षेत्रामध्ये मत्स्य संवर्धनासाठी नवीन तळी तयार करणे, तळ्याचे नुतनीकरण करणे, मत्स्य बीज निर्मिती केंद्र उभारणी, मत्स्य बीज संवर्धन तलाव संच उभारणी, संवर्धनातील निविष्ठा खर्च, पिंजरा उभारणीसाठी या सहा योजना भू-जलाशयीन क्षेत्रात मासेमारी करणाऱ्यांना मूलभूत सुविधा अंतर्गत नवीन नौका व जाळी खरेदी आणि लघू मत्स्यखाद्य कारखान्याची स्थापना या दोन योजना तसेच बचत व निधीद्वारे मच्छीमारांच्या कल्याणासाठी गट विमा योजना, मच्छीमारांसाठी घरकुल योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. या योजनेत राज्य शासनाचा ५० टक्के व ५० टक्के लाभार्थींचा हिस्सा राहणार आहे. केंद्र शासनाच्या नीलक्रांती धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या भू-जलाशयीन मत्स्य व्यवसाय योजनेचा जास्तीत जास्त संस्था, खासगी मत्स्य कास्तकार, उद्योजक यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभाग वाशिमचे सहायक आयुक्त सुखदेवे यांनी केले.