कारंजा (जि. वाशिम): येथील जागृती नगरातील एका घरात दोन लाखाची अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक जागृती नगरात राहणारे प्रविण रमेशराव बिहाडे हे बाहेरगावी गेले असता याचा फायदा चोरटयांनी घेवून बंद असलेल्या घराची मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून १७ फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. यामध्ये २ हजार रूपये नगदीसह १ लाख ९८ हजार रूपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी घरमालकाच्या तक्रारीवरून कारंजा पोलीसांनी अज्ञात चोटरटयांविरूध्द भांदविच्या कलम ४५७, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कारंजात २ लाखाची चोरी
By admin | Updated: February 19, 2015 01:51 IST