शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी केंद्रातील १९ हजार बालकं आधारविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:55 IST

वाशिम - जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील ८८ हजार ६८८ पैकी ६९ हजार ६२६ बालकांची आधार नोंदणी झाली असून उर्वरीत १९ हजार बालकांची आधार नोंदणी बाकी आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालक पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत.पोषण आहार व अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.कोणतेही बालकं वंचित राहू नये म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षिकांवर आधार नोंदणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील ८८ हजार ६८८ पैकी ६९ हजार ६२६ बालकांची आधार नोंदणी झाली असून उर्वरीत १९ हजार बालकांची आधार नोंदणी बाकी आहे. या बालकांच्या आधार नोंदणीसाठी ४० मोबाईल टॅब प्राप्त झाले असून, अंगणवाडी केंद्रातच पर्यवेक्षिकांद्वारे लवकरच आधार नोंदणी केली जाणार आहे.जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालक पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. अंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहार व अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १९ हजार बालकांची आधार नोंदणी अद्याप झाली नाही. आधार नोंदणीअभावी शासनाच्या योजनांपासून कोणतेही बालकं वंचित राहू नये म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षिकांवर आधार नोंदणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पर्यवेक्षिकांना मोबाईल टॅब देऊन बालकांची आधार नोंदणी करण्यात येणार आहे. एका पर्यवेक्षिकेकडे साधारणत: २५ ते ३० अंगणवाडी केंद्रांची जबाबदारी असते. जिल्ह्यासाठी तुर्तास ४० मोबाईल टॅब प्राप्त झाले असून, पर्यवेक्षिकांना योग्य ते प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे महिला व बालकल्याण विभागातर्फे सांगण्यात आले. प्रत्येक अंगणवाडी पर्यवेक्षिकांना विविष्ट ‘आयडी’ देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अंगणवाडी केंद्र स्तरावर बालकांची आधार नोंदणी केली जाणार आहे. तांत्रिक अडचणी उद्भवल्या नाहीत तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास महिला व बालकल्याण विभागाने व्यक्त केला.

जुलै महिन्याचा मुहूर्त हुकलाअंगणवाडी केंद्रात ३१ जुलै २०१८ पूर्वी बालकांची आधार नोंदणी पूर्ण करावी, अशा सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या होत्या. तथापि, तांत्रिक कारणांमुळे अद्याप आधार नोंदणी केंद्र सुरू होऊ शकले नाहीत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंगणवाडी केंद्रातच आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध होईल, या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू असल्याचे महिला व बालकल्याण विभागाने सांगितले.

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्ड