मंगरुळपीर (जि. वाशिम): तालुक्यातील दाभा येथील १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना १९ जुलै रोजी दुपारी घडली आहे. दाभा येथील अर्जुन राजू सोहळे हा गुरे चारण्याकरिता शेतात गेला होता. तो पोहण्यासाठी तलावात उतरला असता पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
१७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू
By admin | Updated: July 20, 2016 02:03 IST