शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसांत १६ हजारांवर कोरोना चाचण्यांचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 11:17 IST

Corona Test ७ दिवसात सुमारे १६ हजार चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करून त्याचे अहवाल वेळेत देण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागाला पेलावे लागणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हाभरात ५ हजारांपेक्षा अधिक व्यापारी असून आस्थापनांमध्ये कार्यरत कामगारांची संख्या सुमारे ११ हजार आहे. संबंधित सर्वांनी २१ मार्चपर्यंत कोरोना चाचणी करून घ्यावी; अन्यथा २२ मार्चपासून दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळणार नाही, असे फर्मान जिल्हाधिकाऱ्यांनी १० मार्च रोजी सोडले. त्यानुषंगाने ११ मार्चपासूनच व्यापारी व कामगारांच्या कोरोना टेस्ट सुरू झाल्या असून पुढील ७ दिवसात सुमारे १६ हजार चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करून त्याचे अहवाल वेळेत देण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागाला पेलावे लागणार आहे. जिल्ह्यात मेडशी येथे एप्रिल २०२० या महिन्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर हा आलेख सातत्याने वाढत गेला. आजमितीस ११ हजारांपेक्षा अधिक रुग्ण झाले असून कोरोना संसर्गाचे संकट दिवसागणिक अधिक तीव्र होत चालले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून विविध स्वरूपातील उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनाधारकांसह आस्थापनेत कार्यरत कामगारांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, अन्यथा २२ मार्चपासून संबंधित आस्थापना बंद ठेवावी लागणार आहे, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले. या आदेशाचे पालन करून ११ मार्चपासूनच शहरी व ग्रामीण भागात व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करणे सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सहाही शहरांमध्ये १३ पथक कार्यान्वित करण्यात आले असून चाचणीसाठी २० हजार किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली. आरोग्य विभाग आता हे आव्हान कसे पूर्ण करते याकडे लक्ष राहणार आहे.

२० हजार कोरोना टेस्ट किट्स उपलब्धशहरी भागात नगरपालिका, ग्रामीणमध्ये ग्रामपंचायतींना आपापल्या क्षेत्रातील व्यापारी व त्यांच्या आस्थापनांमध्ये कार्यरत कामगारांनी कोरोना टेस्ट केली किंवा नाही, यावर लक्ष  ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने चाचणीसाठी २० हजार ‘किट्स’ उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचे १३ पथक याकामी कार्यान्वित करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करून जिल्ह्यातील व्यापारी व त्यांच्या आस्थापनांमध्ये कार्यरत कामगारांची कोरोना चाचणी करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी २० हजार किट्स उपलब्ध असून पथक सक्रिय करण्यात आले आहे. अहवाल वेळेत देण्याचा आरोग्य विभागाचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे.- डॉ. मधुकर राठोडजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या