शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी १६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४२ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 20:18 IST

१६ रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १२ जून रोजी पॉझिटिव्ह आला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : निमजगा, वाशिम येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील १०, रिसोड तालुका २ व मालेगाव तालुक्यातील चार अशा एकूण १६ रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १२ जून रोजी पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४२ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत ३४ जणांवर  विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक परतत असून, सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया संदिग्ध रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गत चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. १२ जून रोजी यामध्ये १६ रुग्णांची भर पडली. गुरुवार ११ जून रोजी एकूण ३३ अहवाल प्राप्त झाले होते. त्यात बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाविषयक अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे. त्याशिवाय दिल्ली येथून सुकळी (ता. कारंजा लाड) येथील तीन आणि कारंजा लाड येथील एका असे पाच जण पॉझिटिव्ह आले होते. १२ जून रोजी सकाळच्या सुमारास दादर (मुंबई) येथून आलेल्या मालेगाव येथील ४६ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्याच्यासोबत आलेल्या इतर २ व्यक्तींचे अहवाल 'निगेटिव्ह' आले. सायंकाळच्या सुमारास एकूण १५ अहवाल पॉझिटिव्ह आले. निमजगा, वाशिम येथील कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १० जणांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये २८, ४५ व ३५ वर्षीय महिला, १३ व १६ वर्षीय युवती, २० वर्षीय युवक, १० व ४ वर्षीय मुली आणि १० व ६ वर्षीय मुलांचा समावेश आहे. दिल्ली येथून आलेल्या एकता नगर, रिसोड येथील ४१ वर्षीय व्यक्ती तसेच रिसोड तालुक्यातील कन्हेरी येथील एका ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर महिला मुंबई येथून आली आहे.मुंबई येथून भेरा (ता. मालेगाव) येथे आलेल्या अनुक्रमे २८ व २३ वर्षीय पती-पत्नी तसेच मुंबई येथून खेर्डा (ता. मालेगाव) येथे आलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. आता रुग्णसंख्या ४२ वर पोहचली असून, यामध्ये ३४ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या