शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख शेतकऱ्यांना मिळणार १४०४ कोटींचे कर्ज

By दिनेश पठाडे | Updated: April 11, 2023 16:25 IST

खरीप हंगामातील कर्जवाटपाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली असून पुढील ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप केले जाणार आहे.

वाशिम :  आगामी खरीप हंगामात  जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ९८८ शेतकऱ्यांना १ हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्या-त्या बँकांना उद्दिष्ठ ठरवून देण्यात आले असून त्यानुसार कर्जवाटप करण्याच्या सूचना सहकार विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

खरीप हंगामातील कर्जवाटपाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली असून पुढील ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप केले जाणार आहे. खरीप हंगामातील पेरणीला अजूनही तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पेरणीवेळी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण जाणवते, उसणवारी, व्याजाने पैसे घेऊन त्यांना पेरणीचे काम पूर्ण करावे लागते. शेतकऱ्यांना पेरणीवेळी पैशाची निकड भासू नये, यासाठी त्यांना पेरणीपूर्वीच कर्ज मिळावे, यासाठी १ एप्रिलपासून कर्जवाटपाला सुरुवात केली जाते. बँकांकडे शेतकऱ्यांनी कर्जप्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना वेळेत कर्ज देणे क्रमप्राप्त असते. मात्र अनेक बँकां कर्जप्रस्ताव निकाली काढण्यास विलंब करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व कर्ज मिळणे कठीण बनते. शिवाय कर्जाचे नुतनीकरण करण्यावरच बँकांचा भर असतो. त्यामुळे नवीन कर्जदार संख्या वाढत नसल्याचे आढळून येते. यंदा बँकांनी पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मध्यवर्ती बँकेला सर्वाधिक उद्दिष्टजिल्ह्यात मध्यवर्ती बँकेच्या अधिक शाखा असल्याने या बँकेला सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आल्याचे चित्र आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला ७७० कोटी १८ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट असून ज्याचा लाभ ६६ हजार ४३९ शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकाना ३७ हजार २८१ शेतकऱ्यांना ४२६ कोटी २२ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. खासगी क्षेत्रातील बँकांना ४ हजार ६३२ शेतकऱ्यांना ५० कोटी ४७ लाख तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला १३६३६ शेतकऱ्यांना १५७ कोटी ९७ लाख रुपये कर्जवाटप लक्षांक देण्यात आला आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्याला यंदा १ हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट मिळाले आहे. जिल्ह्यातील त्या-त्या बँकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे, या हेतूने बँकांनी कर्ज वाटप करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी देखील कर्जासाठी वेळीच प्रस्ताव बँकांकडे द्यावा

- दिग्विजय राठोड, जिल्हा उपनिबंधक, वाशिम

टॅग्स :Farmerशेतकरी