शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात १४ हजारांवर नव्या मतदारांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 16:56 IST

२८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १४०७९ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर ९७७८ मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. 

विशेष संक्षीप्त पुनरिक्षण : जिल्हाभरात मोहिमलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पुढील वर्षी होणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत २८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १४०७९ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर ९७७८ मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत १ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली. तर १ सप्टेंबरपासून दावे व हरकती स्विकारण्यात येत आहेत. ही मोहिम ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत चालेल, त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून, ३ जानेवारीपूर्वी डाटाबेस अद्ययावतीकरण करून पुरवणी यादीची छपाई करण्यासह ४ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण १०४३ मतदान केंद्र असून, प्रत्ये मतदान केंद्रांवर बीएलओची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिपाई, अंगणवाडीसेविका, नगर परिषद कर्मचारी व शिक्षकांचा समावेश आहे. या मोहिमेंतर्गत नव मतदारांची नोंदणी करण्यासह मयत मतदारांची नावे वगळणे आणि स्थलांतरीत मतदारांची दुरुस्तीही करण्यात येत आहे. यात जिल्हाभरात २८ सप्टेंबरपर्यंत १४ हजार ७९ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर ९७७८ मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. नवीन कंट्रोल व बॅलेट युनिट प्राप्तआगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर जिल्हा निवडणूक विभागास नवीन १३४८ कंट्रोल युनिट, २३१८ बॅलेट युनिट प्राप्त झाले असून, लवकरच व्हीव्हीपॅट मशीनदेखील प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी दिली.   ४६१० दिव्यांग मतदारांची नोंदणी शासन निर्देशानुसार दिव्यांग मतदारांच्या विशेष नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरदरम्यानच्या कालावधीत ४६१० दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. ही मोहिम ३० आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे.

टॅग्स :washimवाशिम