शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

१४९५ जागांसाठी ४८९९ उमेदवारी अर्ज

By admin | Updated: July 21, 2015 00:53 IST

वाशिम जिल्ह्यातील निवडणूक रणधुमाळी ; १६३ ग्रामपंचायतींची होणार निवडणूक.

वाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या १४९५ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ४८९९ हजार उमेदवारी अर्ज प्राप्त झालेत. वाशिम तालुक्यात २३ ग्रामपंचायतींमध्ये २३१ सदस्य, मालेगाव तालुक्यात ३0 ग्रामपंचायतींमध्ये २७६ सदस्य , मंगरुळपीर तालुक्यात २५ ग्रामपंचायतींमध्ये २0९, रिसोड तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींमध्ये ३३४ सदस्य, कारंजा तालुक्यात २८ ग्रामपंचायतींमध्ये २११ सदस्य, मानोरा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींमध्ये २३४ सदस्य अशा एकूण १६३ ग्रामपंचायतींमध्ये १४९५ सदस्य निवडूून द्यावयाचे आहे. ग्रामीण भागातील अतिशय महत्त्वाच्या व अटीतटीच्या होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी, २0 जुलैला जिल्ह्यातील तहसील कार्यालयावर मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वाशिम तालुक्यातून ३९७, रिसोड ६५0, मालेगाव ६१६, मंगरुळपीर २८३, कारंजा ५५४ व मानोरा तालुक्यातून ३१५ असे एकूण ४८९९ अर्ज प्राप्त झालेत. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतसाठी होत असलेल्या निवडणुकीकरिता तालुकानिहाय शेवटच्या दिवसापर्यंत एकूण प्राप्त अर्जामध्ये वाशिम तालुक्यातून ७५३, रिसोड १0८६, मालेगाव ९६८, मंगरुळपीर ७८२, कारंजा ६७९ व मानोरा तालुक्यातून ६३१ असे एकूण 000 अर्ज प्राप्त झालेत. २१ जुलै रोजी अर्जाची छाननी होणार आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतीसाठी इच्छूक उमेदवारांचे १९८0 नामांकन अर्ज दाखल झाले होते. १८ जुलैचा रमजान दिन आणि १९ जुलैचा रविवार यामुळे या दोन्ही दिवशी इच्छुकांना अर्ज दाखल करता आले नाहीत त्यामळे शेवटच्या दिवशी २0 जुलैला जिल्हयातील तहसील कार्यालयावर मोठय़ा प्रमाणात अर्ज भरणार्‍यांची गर्दी दिसून आली. जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक आणि पोटनिवडणुकांसाठी ह्यऑनलाइनह्ण उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेदरम्यान शहरासह ग्रामीण भागात ह्यइंटरनेट कनेक्टिव्हिटीह्ण नसल्यामुळे ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक दिसून आली. ऑनलाइनचा गोंधळ पाहता, राज्य निवडणूक आयोगाने अर्ज स्वीकारण्याला दीड तासांची मुदतवाढ दिली तसेच पारंपरिक पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबात सूचित केले. तसेच मालेगाव तालुक्यातील वसारी, तिवळी यांसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायत अविरोध होण्याची शक्यता असली तरी अद्याप याबाबत घोषणा करण्यात आली नाही.