शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

१३८ कुपोषित बालकांकरीता ८३ ग्राम बालविकास केंद्रांची सुविधा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 15:14 IST

१३८ कुपोषित बालकांवर योग्य उपचार मिळावे, संतुलित पोषण आहार मिळावा याकरिता एकूण ८३ ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहे. 

वाशिम : जिल्ह्यातील १३८ कुपोषित बालकांवर योग्य उपचार मिळावे, संतुलित पोषण आहार मिळावा याकरिता एकूण ८३ ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्याबरोबरच कुपोषित बालकांवर योग्य उपचार मिळावे, संतुलित पोषण आहार मिळावा, याकरिता ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी यापूर्वी बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिकांचा आढावा घेतला होता.कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार देणे आणि वेळीच आवश्यक आरोग्य सेवा पुरविणे या दोन्ही महत्त्वाच्या बाबी आहेत. किंबहुना पूरक पोषण आणि आरोग्य सेवा या दोन्ही  सेवा एकत्रितपणे आणि समन्वयाने पुरविल्या तरच हा प्रश्न सोडविता येईल. त्या अनुषंगाने अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करुन कुपोषित बालकांवर योेग्य उपचार करण्याची ही योजना शासनस्तरावरूनच समोर आली.आठवड्यातून एकदा एएनएम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ग्राम बालविकास केंद्राला भेट देऊन सर्व बालकांची तपासणी, चाचणी करतात. ज्या बालकांमध्ये वाढ किंवा सुधारणा दिसून येणार नाहीत, त्यांच्या बाबतीत पुढील वैद्यकीय उपचार केले जातात. अंगणवाडी सेविकांनी बालकांची दरमहा वजन आणि उंची घेऊन बालकांची वर्गवारी साधारण, कुपोषित आणि अति कुपोषित अशी केली जाते. बालकास ग्राम बालविकास केंद्रात दाखल केल्यानंतर सकाळी तसेच सायंकाळच्या वेळेत उपचार केले जातात. संबंधित बालकांना व त्यांच्या पालकांना पुढील ३० दिवस सलगपणे अंगणवाडीत बोलाविले जाते.वाशिम तालुक्यात १७० अंगणवाडी केंद्र असून, २९ कुपोषित बालके आढळून आली आहेत. या बालकांवर योग्य उपचार होण्यासाठी १९  ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. याप्रमाणेच रिसोड तालुक्यात १८६ अंगणवाडी केंद्र असून, १३ कुपोषित बालके आहेत. येथे ९  ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले. मालेगाव तालुक्यात १८० अंगणवाडी केंद्र असून, ३८ कुपोषित बालकांच्या उपचारासाठी १७  ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली. मंगरूळपीर तालुक्यात १८७ अंगणवाडी केंद्र असून, १४ कुपोषित बालकांच्या देखरेखसाठी ९  ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले. कारंजा तालुक्यात १५६ अंगणवाडी केंद्र असून, ९ कुपोषित बालकांच्या उपचारासाठी ६  ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले तर मानोरा तालुक्यात १९७ अंगणवाडी केंद्र असून, ३५ कुपोषित बालकांच्या उपचारासाठी २३  ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर