शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग लागवड योजनेंतर्गत मिळणार १.३७ लाख रुपये अनुदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 15:11 IST

वाशिम : शेतीतून अधिकाधिक उत्पादन मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

ठळक मुद्दे पीक निहाय हेक्टरी किमान १ लाख १४ हजार ते १ लाख ३७ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहेत.पात्र व्यक्तीला जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. अन्य प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉबकार्डधारक असल्यास ती या योजनेसाठी पात्र आहे.

वाशिम : शेतीतून अधिकाधिक उत्पादन मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. तीन वर्षात हेक्टरी १.३७ लाख रुपयादरम्यान मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ८ जून २०१८ पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन वाशिम तालुका प्रशासन व कृषी विभागाने केले. 

पारंपारिक शेतीला आधुनिक पद्धतीने फळबागेची जोड मिळाली तर अधिकाधिक उत्पादन मिळू शकते. शासनाच्यावतीनेदेखील यासाठी अनुदान दिले जाते. आवळा, चिंच, आंबा, लिंबू, सीताफळ, चिकू, पेरू, जांभूळ, अंजीर, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कवठ या फळपिकांसाठी अनुदान दिले जाते. फळबाग लागवड योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषि कर्जमाफी योजना २००८ नुसार लहान शेतकरी (एक हेक्टरपेक्षा जास्त पण २ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी, जमीन मालक किंवा कुळ) व अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत (वन निवासी वन अधिकार मान्यता) लाभार्थी अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्तीला जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. अन्य प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉबकार्डधारक असल्यास ती या योजनेसाठी पात्र आहे. इच्छुक लाभार्थींच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.  या योजनेतून तीन वर्षामध्ये पीक निहाय हेक्टरी किमान १ लाख १४ हजार ते १ लाख ३७ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहेत. वाशिम तालुक्यातील पात्र शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले प्रस्ताव ग्रामपंचायत, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, तहसीलदार कार्यालयाकडे ८ जून २०१८ पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती