शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील १.३५ लाखांवर कुटूंबांना मिळणार ‘गोल्डन कार्ड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 15:53 IST

जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५५३ कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार असून त्यासाठी ‘गोल्डन कार्ड’ देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार पात्र असलेल्या दारिद्रयरेषेखालील जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५५३ कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार असून त्यासाठी ‘गोल्डन कार्ड’ देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयांमधील आरोग्य मित्रांना भेटून नोंदणी करावी. आपले सरकार सेवा केंद्रातून कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी प्रती व्यक्ती ठराविक नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. अंगीकृत रुग्णालयांमध्ये मात्र कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीआयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त डाटा एन्ट्री आॅपरेटर व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. त्यात नाव असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड तयार करून घेण्यासाठी शिधापत्रिका, प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे वितरीत करण्यात आलेले पत्र आणि आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. एखाद्या कुटुंबास प्रधानमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र वितरीत झाले नसेल व त्यांचे नाव यादीत असेल तर त्यांनी शिधापत्रिका व आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमayushman bharatआयुष्मान भारत