वाशिम : जिल्ह्यातील सहा केंद्रात १३ डिसेंबर रोजी १३४३ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दिली.प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. इयत्ता दहावीत शिकत असलेले विद्यार्थी यासाठी पात्र असतात. राष्ट्रीय परीक्षेतून देशभरातील २००० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य शाखांमध्ये पीएचडी पदवी प्राप्त करेपर्यंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १३८१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी ३८ विद्यार्थी गैरहजर राहिले, तर १३४३ विद्यार्थ्यांनी सहा परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. वाशिम शहरातील एसएमसी इंग्लिश स्कूल वाशिम या केंद्रात एकूण ३१८, रेखाताई राष्ट्रीय कन्या विद्यालय वाशिम येथे १५०, भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे ३३८, जे.सी. हायस्कूल कारंजा लाड येथे २४०, ना. ना. मुंंदडा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथे १४९, नाथ विद्यालय, मंगरूळपीर येथील केंद्रावर १४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. स्थानिक एसएमसी परीक्षा केंद्राला माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, विज्ञान पर्यवेक्षक एल.एस. भुरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी केंद्रप्रमुख प्राचार्य मीना उबगडे, केंद्र संचालक अभिजित जोशी, उपकेंद्र संचालक प्रणिता हरसुले यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
१३४३ विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 11:32 IST
National Talent Search Exam राष्ट्रीय परीक्षेतून देशभरातील २००० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
१३४३ विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा
ठळक मुद्देजिल्ह्यातील १३८१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. ३८ विद्यार्थी गैरहजर राहिले, तर १३४३ विद्यार्थ्यांनी सहा परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली.